वसई : वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारी आरोग्यसेवा आजपासून मोफत करण्यात आली आहे. पालिकेच्या सर्व रु ग्णालयांत दिल्या जाणार्या मोफत वैद्यकिय सेवा योजनेचा शुभारंभ आज शुक्र वारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रथम महिला महापौर प्रविणा ठाकूर यांच्या हस्ते झाले.महानगरपालिकेने सर्व वैद्यकीय सेवा मोफत केली आहे. याचा शुभारंभ शुक्रवारी तुळींज हॉस्पीटल, नालासोपारा येथे प्रथम महिला महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौररु पेश जाधव, उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, आरोग्य सभापती राजेंद्र कांबळी, महिला बाल कल्याण सभापती माया चौधरी, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले, डॉ. प्रविण क्षिरसागर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.महानगरपालिकेकडे सध्या २ रु ग्णालये, ३ माता बाल संगोपन केंद्र , २१ आरोग्य केंद्र आहेत. या ठिकाणी दररोज हजारो रु ग्ण उपचारासाठी येतात. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून त्यांना येणार कमीत कमी खर्च देखील परवडण्यासारखा नसतो. ही बाब लक्षात घेऊन माजी महापौर प्रविणा ठाकूर यांनी जानेवारी २०१९ मध्ये महासभेत वैद्यकीय सेवा मोफत मिळावी असा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव वसई तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने फायदेशीर असल्याने त्यांच्या या प्रस्तावाला महासभेत तात्काळ मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आज या मोफत आरोग्य सेवेचे उदघाटन करण्यात असून जागतिक महिला दिनी नागरिकांना ही सुविधा मोफत मिळण्यास सुरवात होणार आहे.
वसई-विरार मनपाकडून मोफत आरोग्यसेवेचा आरंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 12:00 AM