शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

राजकीय खलबतांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 2:37 AM

लकमंत्री विष्णू सवरा यांना खासदारकीचे तिकीट देऊन त्यांना राज्यातून थेट केंद्रात पाठविण्या बाबत ही चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे.

पालघर : पालघर लोकसभेच्या पोट निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना, बहुजन विकास आघाडी आदी प्रमुख पक्षांनी आपले उमेदवारांच्या नावांची घोषणा अजूनही केली नसून उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व पक्षांच्या भूमिका स्पष्ट होणार असल्याचे चित्र आहे.पालघर लोकसभेची पोटनिवडणूक मुख्य निवडणूक आयोगाने २८ मे रोजी घोषित केल्याने सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, माकप या पक्षांनी आपल्या भूमिका अजूनही स्पष्ट केलेल्या नाहीत.खासदार चिंतामण वनगा यांच्या अकाली निधना नंतर पोटनिवडणूक जाहीर होण्या आधीच त्यांचा मुलगा श्रीनिवास याला लोकसभेचे तिकीट देण्या बाबत मतप्रवाह पुढे आला होता. मात्र, त्याला तिकीट मिळू नये यासाठी वणगांची शोकसभाच होऊ नये याचा प्रयत्न स्वकिया कडून करण्यात आला. आणि ज्या व्यक्तीने आयुष्यभर निष्कलंक राहून पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले त्यांच्या सारख्या निस्वार्थी माणसा सोबत भाजपचे प्रदेश सदस्य बाबजी काठोळे यांच्या विरोधात मुख्यमंत्र्या कडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाजपमध्ये गट तटाचे राजकारणाने उचल खाल्ली होती.दुसऱ्या बाजूने आदिवासी विकास मंत्री आणि पालकमंत्री विष्णू सवरा यांना खासदारकीचे तिकीट देऊन त्यांना राज्यातून थेट केंद्रात पाठविण्या बाबत ही चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, आपले कॅबिनेट मंत्रिपद संपुष्टात येईल या धास्तीने ते आपला मुलगा डॉ. हेमंत सवरा यांना खासदारकीची तिकीट मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे कळते. परंतु सवरांच्या कामकाजा विरोधात मतदारा मध्ये नाराजी असून वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपची उमेदवार असलेल्या सवरांच्या मुलीला मतदारांनी नाकारल्याने तिला पराभव पत्करावा लागला होता.तसेच आदिवासी विकास विभागाचा निधी ५० टक्केहून कमी खर्च करणे, जिल्ह्यातील आदिवासी विभागाच्या कामाकडे करण्यात आलेले दुर्लक्ष, ठक्कर बाप्पा अंतर्गत विकास कामाबाबत झालेला गैरव्यवहार, तरु णांचा रोजगाराचा वाढता प्रश्न, वाढते कुपोषण, ढासळलेली आरोग्य सेवा, प्रशासनावरील सैल झालेली पकड आदी अनेक कारणांमुळे भाजप आणि सवरा विरोधात मतदारामध्ये प्रचंड नाराजी आहे.श्रीनिवासला राजकीय कामकाजाचा गंध नसल्याने वणगांचा मुलगा म्हणून श्रीनिवासला सहानुभूतीचा लाभ मतदारा कडून मिळाल्यास त्याच्या विजयाच्या आशा निर्माण होऊ शकतात. मात्र, तरीही जेमतेम ८-१० महिन्याचा कालावधी त्याला मिळणार असल्याने शिकण्यातच त्याचा वेळ निघून जाणार आहे.काँग्रेस कडून माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, माजी खासदार दामू शिंगाडा, शंकर नम आदी ५-६ लोकांनी उमेदवारी मागितली असली तरी जिल्ह्यात काँग्रेस पक्षासाठी काम करणारे एकमेव उमेदवार म्हणून गावीतांकडे पाहिले जाते. तर शिवसेना, बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आदी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने मे च्या पहिल्या आठवड्यात सर्व पक्षांच्या भूमिका स्पष्ट होणार आहेत. एकंदरच आतापासून जिल्ह्यात राजकीय दंडबैठका सुरु झाल्या आहेत.घराणेशाहीविरोधात रवींद्र खुताडेपालघर लोकसभा मतदार संघाच्या जाहीर झालेल्या पोटनिवडणुकी साठी भाजपा कडून आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या मुलाचे नाव पुढे रेटले जात आहे. आपले मंत्रिपद वाचविण्याची खेळी बरोबरच खासदारकी वर हक्क प्रस्थापित करण्याचा दुहेरी डाव हाणून पाडण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी दंड थोपटले आहेत. अपयशी ठरलेल्या सवरानी घराणेशाही लादल्यास त्यांच्या विरोधात विक्र मगड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष रवींद्र खुताडे उभे करण्याचे सांबरेंनी जाहीर केल्याने भाजप ला त्याचा मोठा फटका बसू शकतो.जिल्ह्यातील पक्ष आणि शक्यताभाजपा ला बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेची साथ मिळू शकतेभाजप आणि शिवसेनेची युती होईलभाजप, शिवसेना,बहुजन आघाडी स्वतंत्र लढतीलकाँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची आघाडी होईलमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष स्वतंत्र लढण्याच्या मनिस्थतीत नसल्याने ते काँग्रेस ला पाठिंबा देतील.मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे ची जाहीर सभा 1 मे रोजी होणार असल्याने त्यावेळी ते आपली भूमिका स्पष्ट करतील.

टॅग्स :Electionनिवडणूक