वसई : या तालुक्यातील सात शाळांतील एकूण दहा वर्ग खोल्या बांधण्यासाठी जिल्हा परिषदेने सर्व शिक्षा अभियानातून निधी मंजूर केला असून त्यापैकी १५ लाखांचा निधी संबंधित शाळांच्या व्यवस्थापन समितीकडे देण्यात आला आहे. मात्र, डिजीटल झालेल्या २५ शाळांच्या इमारतींची मोठी दुरुस्ती करणे आवश्यक असतांना यातील फक्त एकाच शाळेचा समावेश आहे.प्रत्येकी तीन लाखांहून अधिक रुपये खर्च करून शाळा डिजीटल करण्यात आल्या असल्या तरी त्यातील २५ शाळांच्या इमारती धोकादायक असून त्यांची दुरुस्ती करण्याची गरज असल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकाºयांनी दिला आहे. यातील आडणे येथील शाळेची इमारत कोसळल्याने वर्ग सार्वजनिक ठिकाणी भरवले जात आहेत. लोकमतनेही शाळांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले होते. जिल्हा परिषदेने तालुक्यातील वालीव, भोईदापाडा, चंद्रपाडा, वाधरळपाडा, आडणे, पळीपाडा, भारोळ या सात शाळांच्या वर्गखोल्यांचा त्यात समावेश आहे. आरसीसी खोल्या बांधण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. इतर चोवीस शाळांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले गेल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.गरज आहे ५३ खोल्यांचीडिजीटल झालेल्या पंचवीस शाळांची मोठी दुरुस्ती तातडीने करून त्याठिकाणी ५३ नव्या वर्ग खोल्या बांधण्याची आवश्यक असल्याकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्याने दुर्लक्ष केल्याचे दिसतआहे. आडणे शाळेत नवीन २ खोल्यांची गरज असतांना एकच बांधण्यात येणार आहे.
धोकादायक शाळांच्या दुरुस्तीला सुरुवात, सर्व शिक्षा अभियानातून निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 5:37 AM