शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

टोल सुरू, रक्कम सरकारी खजिन्यात

By admin | Published: December 22, 2016 5:34 AM

वाडा-भिवंडी-मनोर या महामार्गावरील दोनही नाक्यांवरील टोलदुरूस्ती सुरू ठेवावी मात्र त्यातून गोळा होणारी रक्क्म सरकारी खजिन्यात

वाडा : वाडा-भिवंडी-मनोर या महामार्गावरील दोनही नाक्यांवरील टोलदुरूस्ती सुरू ठेवावी मात्र त्यातून गोळा होणारी रक्क्म सरकारी खजिन्यात भरली जावी, असा आदेश हायकोर्टाने दिल्यामुळे या महामार्गावरील सार्वजनिक बांधकाम खात्याने जाहीर केलेली टोलमुक्ती अल्पजीवी ठरली आहे. काम पूर्ण न करताच सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने टोल वसुली सुरू केली होती. या विरोधात अनेक आंदोलने झालीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल घेऊन टोल नाके बंद केले होते. मात्र सुप्रीम कंपनी न्यायालयात गेल्याने हे टोलनाके पुन्हा सुरू झाले मात्र जमा झालेल्या रकमेचा भरणा शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. या ६४ किलो मीटर लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुप्रीम कंपनीला बांधा वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर पाच वर्षापूर्वी देण्यात आले होते. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. सर्वत्र पडलेले खड्डे अनेक ठिकाणची अपूर्ण कामे त्यामुळे हा रस्ता या वाहतूकीसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत वेळोवेळी अनेक आंदोलने झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने आंदोलनाची दखल घेवून रस्त्याच्या दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्याच्या सुचना दिल्या तरी देखील सुप्रिम कंपनीला जाग येत नसल्याने अखेर टोल वसूली बंद केली. म्हणून कंपनी न्यायालयात गेली व न्यालयाच्या आदेशानुसार या रस्त्याचे आॅडीट करण्यात आले व सार्वजनिक बांधकाम प्रशासनाकडून तज्ञांच्या सहाय्याने मशिन व्दारे उद्या पाहणी करून रस्त्याचा दर्जा ठरविण्यात येणार आहे. (वार्ताहर)