विरार : डासांच्या निर्मुलनासाठी वसई-विरार महापालिकेने विविध पद्धतींचा अवलंब केला असला तरी फवारणी होणे गरजेचे आहे. परंतु, वसई विरार शहरात नियमित फवारणी होत नसल्याने डासांची संख्या वाढत आहे. यामुळे नागरिकांना मोठा आजार होण्याची शक्यता देखील वाढली आहे. डासांमुळे नागरिकांचे बाहेर पडणे कठीण झाले असून त्यांच्यासाठी ही मोठी समस्या बनली आहे.डासांच्या निर्मुलनासाठी महापालिके तर्फे दर आठवड्याला नियमित फवारणी केली जाते. पण गेल्या काही महिन्यांपासून ती होत नसल्याने शहरात डासांचे प्रमाण वाढत आहे. नाले सफाई आभावी डासांची संख्या आणखी जास्त वाढत आहे. नाल्याच्या बाजूला असलेले परिसर व इमारतींमध्ये फवारणी केली जाणे अतिशय गरजेचे आहे. पण ती देखील होत नसल्याने नागरीक हैराण आहे.डासांच्या निर्मुलनासाठी पालिकेने २० कोटी रु पयांची तरतूद केली आहे. पण डासांची संख्या कमी होत नसल्याने त्यामुळे कोणताही मोठा आजार होण्याची शक्यता वाढली आहे. अनेकदा फारावणी प्रक्रि येत पाणी जास्त व औषध कमी टाकले जाते यामुळे फवारणी नंतर त्याचा तितकासा परिणाम होताना दिसत नसल्याने डास समूळ नष्ट होत नाहीत.एकात्मिक डास निर्मुलन प्रक्रि या महापालिके कडून सुरु करण्यात आली होती. यात तीन प्रकारे डास निर्मुलन करण्यात येणार होते. इंजिनियर पद्धती, रसायन पद्धती आणि बायलॉजिकल पद्धती. प्रत्येक पद्धती ही वेग वेगळ्या ठेकेदाराला वाटून देण्यात येणार होते. संध्याकाळी बाहेर फिरण्यासाठी बाहेर पडताना देखी नागरिकांना अनेकदा विचार करावा लागतो. तसेच डासांमुळे नागरिकांना मच्छर जाळी, मच्छर मारणारी बॅट घेऊन बसावे लागते तर संध्याकाळच्या वेळेस घराची दारं खिडक्या बंद करून बसावे लागते असे नागरिकांचे म्हणणे आहे. पालिकेने डासांची संख्या कमी करण्याचा विडा उचलला असला तरी काम होताना दिसून येत नाहीये असा आरोप नागरिकांनी पालिके वर लावलेला आहे तर डासांमुळे आजार पसरण्याची पालिका वाट पाहत आहे का ? असे प्रश्न देखील विचारले जात आहेत. यावर अजूनही काम सुरु झाले नसले तरी फवारणी ही मुलभूत प्रकिया आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त डास कमी करता येतील. नाले व गटारे सुकल्यामुळे घाणीत डास आणखी जास्त वाढत आहेत यामुळे डेंगू, मलेरिया सारखे आजारांचे प्रमाण वाढत आहेत.तोकड्या उपाययोजना नियोजनाची आवश्यक्तावसई विरार शहरात मोठ मोठे नाले असल्याने त्याबाजूला असणारी वस्ती देखील मोठ्या प्रमाणात आहेत. डासांमुळे जीव घेणे आजार होत असल्याने प्रथमिक पातळीवर काम सुरु होणे गरजेचे आहे. पालिके कडून होणारे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतू शकते त्यामुळे लवकरात लवकर दास निर्मूलन करण्यात येणे गरजेचे आहे.डास निर्मुलन हे नागरिकांसाठी केले जाणे गरजेचे आहे. याची आम्हाला संपूर्ण माहिती आहे. त्यासाठी काम देखील सुरु झाले आहे. जितकं जमेल तितकं लवकर डासांचे प्रमाण कमी व्हावे हाच आमचा प्रयत्न असणार आहे.- माधव जावदे, शहर अभियंता
वसई-विरारमध्ये डासांचे राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 11:26 PM