शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

राज्यमार्गाचे काम अर्धवट

By admin | Published: June 16, 2015 10:59 PM

कर्जत-मुरबाड या राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरण राज्य सरकारच्या अ‍ॅसेट निधीमधून पूर्ण करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम

कर्जत : कर्जत-मुरबाड या राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरण राज्य सरकारच्या अ‍ॅसेट निधीमधून पूर्ण करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी सुरक्षा दगड आणले आहेत. ते दगड जमिनीमध्ये अर्धवट गाडून त्यांना पांढरा रंग लावण्याचे काम ठेकेदार कंपनीने अपूर्ण ठेवले आहे. कर्जत-मुरबाड राज्यमार्ग रस्त्याने जेएनपीटीकडे जाणारी आणि नाशिककडे जाणारी अवजड वाहने यांची वर्दळ असते. त्यामुळे कर्जत तालुक्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे या राज्यमार्ग रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी स्थानिक आमदार करीत होते. अखेर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांच्या रस्ते विकास म्हणजे अ‍ॅसेट निधीमधून या रस्त्याच्या रुंदीकरणास शासनाने परवानगी दिली होती.कर्जत तालुका हद्दीतील ३५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले असून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात अद्याप रस्त्याचे काम सुरू झाले नाही. रस्त्याचे चौपदरीकरण झाले असते तर वाहनांसाठी एकमार्ग तयार झाला असता. पर्यायाने वाहतूक खोळंबा आणि अपघात यांचे प्रमाण देखील कमी झाले असते. परंतु तसे झाले नसले तरी रस्त्याचे रु ंदीकरण झाल्याने वाहनचालकांना चांगला रस्ता प्रवासासाठी मिळाला आहे. रस्त्याच्या कामामध्ये कर्जत तालुक्यात रुंदीकरण, डांबरीकरण ही मुख्य कामे झाल्यानंतर रस्त्यावर दुभाजक यांची रंगरंगोटी आणि रस्त्याच्या दुतर्फा टाकण्यात आलेल्या मातीच्या साईडपट्टीमध्ये सिमेंटचे ठोकळे असलेले दगड गाडून त्यांना पांढरा रंग लावण्याचे काम करणे बंधनकारक होते. मात्र ठेकेदार कंपनीने रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी आणलेले दगड आजही तसेच पडून आहेत.कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारले असता दगड मातीमध्ये टाकण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती दिली. परंतु ते दगड मातीमध्ये कधी गाडणार, याचे उत्तर दिले नाही. त्या दगडांना लावलेल्या पांढऱ्या रंगामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालक यांच्यासाठी ही सूचना असते. त्यामुळे अवघड वळण आणि तीव्र उतार असलेल्या रस्त्यावर त्यांना त्याची मदत होत असते. परंतु राज्यमार्ग रस्त्यावर असे सुरक्षा दगड न लावल्यामुळे ठेकेदार कंपनीला तत्काळ सूचना देण्याची गरज आहे. पण ठेकेदार कंपनीचे लाड कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग करताना दिसत आहे. (वार्ताहर)दगड रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी आणून टाकण्यात आले आहेत, परंतु ते लावण्याचे आदेश ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहेत.- एस. एस. ढिलपे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम, कर्जत