- हितेन नाईकपालघर : एसटी संघटना आणि शासनाच्या दरम्यान तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वाटाघाटीला यश मिळत नसल्याने पालघर विभागांतर्गत आठ डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नाही. शासन पातळी वरून हा संप चिरडण्याचे प्रकार सुरु असताना पालघरमध्ये सर्व कर्मचाºयांना विश्रांतीगृहातून बाहेर काढीत टाळे ठोकले आहे. पाण्याचा पुरवठाही बंद करण्यात आला असून गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या आगार व्यवस्थापका कडून देण्यात येत आहेत.पालघर विभागांतर्गत पालघर, बोईसर, सफाळे, डहाणू, जव्हार, वसई, नालासोपारा, अर्नाळा, अश्या आठ आगरातून दररोज ४०० शेड्युल (बसेस)द्वारे ३ हजार ६२३ फेºया मारल्या जात असून १ लाख २७ हजार ७०० किमी च्या प्रवासाचा टप्पा गाठून सुमारे ४० ते ४५ लाखाचे उत्पन्न दररोज पालघर विभागाला मिळते.दररोज सुमारे २ ते २ लाख २५ हजार प्रवाशी एसटी ने प्रवास करीत असतात.ऐन दिवाळीच्या तोंडावर आपल्या प्रलंबित मागण्यासाठी सोमवार पासून एसटी कामगार संघटना, श्रमिक कामगार संघटना व इतर चार संघटनांनी राज्यभर कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. गुरुवारी बंद ला तीन दिवस होत असून ह्या कामबंद आंदोलनामुळे विभागाला सव्वा ते दिड कोटीचे नुकसान झाले आहे. दिवाळी सणामध्ये प्रवाश्यांच्या गैरसोय होऊ नये म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागाने वसई, विरार, नालासोपारा व बोईसर डेपोमध्ये एकूण ४७ खाजगी बसेस ना वाहतुकीला परवानगी देण्यात आल्याचे विरार उपप्रादेशिक विभागाचे अधिकारी अनिल पाटील ह्यांनी लोकमत ला सांगितले. फक्त नालासोपारा डेपोतून बसेस साठी प्रवाश्यांची मागणी होत असून अन्य आगारातून खाजगी बसेस ची मागणी नसल्याचेही त्यांनी सांगितले.पालघर विभागांतर्गत आठही आगारातून शांततेच्या मार्गातून कामबंद आंदोलन शांततेत सुरू असताना शासनाच्या आदेशाने प्रशासन कर्मचाºयांवर विविध प्रकारे दडपण आणीत आहे. बुधवार पासून पालघर आगारातील विश्रांतीगृहातून सर्व कर्मचार्यांना बाहेर काढून टाळे ठोकण्यात आले असून घोषणा, निषेध, पुतळा जाळणे, खाजगी बसेस ना विरोध करणे, मुंडण करणे असे प्रकार केल्यास तात्काळ गुन्हे दाखल करण्याचा धमक्या आगार व्यवस्थापक नितीन चव्हाण ह्यांनी दिल्याची माहिती कर्मचाºयांनी लोकमतला दिली.राज्यातील पिंपरी- चिंचवड आगारातील विश्रांतीगृहातून चालक-वाहकाना पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्यात आले असून कल्याण मध्ये कर्मचाºयांनी मुंडण करीत शासना विरोधात निषेध व्यक्त केला. तर अहमदनगर येथे किर्तना द्वारे शासनाचा निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र पालघर मध्ये अजूनही शांततेत कामबंद आंदोलन सुरू आहे.कर्मचाºयांच्या सोयीसुविधा बंद करून धमक्या देऊन त्यांनी चालू केलेला संप चिरडण्याचे प्रयत्न प्रशासना कडून सुरू असून मात्र शांतपणे बसून, जेवण आगारातच शिजवून कर्मचारी आपल्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती करीत आहेत. देशभर दिवाळी साजरी केली जात असताना हे कर्मचारी आणि त्यांची कुटुंबे मात्र शासन सकारात्मक निर्णय घेईल ह्या आशेवर आहेत.दुसरीकडे वसई, नालासोपारा, अर्नाळा येथून प्रवाश्यांची खाजगी बसेस साठी मागणी होत असून अन्य आगारा कडे प्रवाशी ढुंकूनही बघत नसल्याचे दिसून येत आहे.प्रवाशांनीही निवडले सोयीचे मार्गवसई, नालासोपारा, अर्नाळा येथून प्रवाश्यांची खाजगी बसेस साठी मागणी होत असून अन्य आगारा कडे प्रवाशी ढुंकूनही बघत नसल्याचे दिसून येते. तीन, चार चाकी रिक्षाधारकाकडे प्रवाशांचा ओढा असून हे सेवा जोरात सुरू असल्ंयाने त्यांची दिवाळी जोरात आहे. तर लांब पल्ल्याच्या सेवेसाठी येथील प्रवाशी रेल्वे सेवेला प्राधान्य देत आहेत.माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी गुरुवारी पालघर आगारातील संपक-यांची भेट घेऊन जाहिर पाठिंबा दर्शवला. तसेच जनता दल पालघरनेही या संपाला आपला पाठिंबा दिला आहे. जिल्हाध्यक्ष लवेकर यांनी लोकमतला माहिती दिली.
आंदोलन चिरडण्यासाठी आटापीटा, एसटीच्या विश्रांतीगृहाला ठोकले टाळे, पाण्याचा पुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 5:40 AM