पालघर : समुद्रात अचानक निर्माण झालेल्या वादळी वाऱ्याच्या फटकाºयाने सातपाटी येथील रवींद्र दवणे ह्यांची ‘पंचाली’ ही बोट भरकटुन बंधाऱ्याच्या दगडात अडकली. स्थानिक मच्छीमारांनी एकत्र येऊन ती सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. परंतु बोटीचे हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे.
दक्षिण पूर्व बंगालच्या खाडी लगत ३० एप्रिल पासून निर्माण झालेल्या जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे फनी हे निर्माण झालेले वादळ पुढील काही काळात तामिळनाडूच्या उत्तरे कडील किनाºयावर तसेच आंध्रप्रदेशच्या दक्षिण किनाºयावर धडकू शकते असा कयास हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता.तसेच हे वादळ किनाºयावर धडकण्यापूर्वी हे चक्रीवादळ परत फिरण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. सोमवार पासून दमण आणि गुजरात च्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या काही बोटींना खवळलेल्या समुद्राचा आणि जोरदार वाºयाचा सामना करावा लागला होता. ह्याचा फनी वादळाचा काहीही संबंध नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तर मग सोमवार पासून समुद्रात गुजरात राज्याच्या काही भागात जोरदार वाºयाचे उमटत असलेले पडसाद कसले? असा प्रश्न सातपाटी मधील मच्छीमार महेश भोईर ह्यानी उपस्थित केला. ह्या संदर्भात हवामान विभागाशी संपर्क साधला असता फनी वादळशी ह्याचा कुठलाही संबंध नसून उष्णतेमुळे समुद्र खवळलेला राहत असावा असा तर्क त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील पालघर,डहाणू व वसई भागातील हजारो बोटी ह्या मासेमारी साठी दिव-दमण किंवा गुजरातच्या जाफराबाद भागात जाऊन मंगळवारी आपल्या बंदरात परत येत असताना अनेक बोटींना जोरदार वारा आणि खवळलेल्या समुद्राचा सामना करीत सुखरूपपणे आपला किनारा गाठावा लागला होता.
मंगळवारी सातपाटी येथील एक मच्छीमार रवींद्र दवणे यांनी आपली बोट समुद्रात अँकर (लोखंडी लोयली) च्या सहाय्याने नांगरून ठेवली होती. त्या रात्री अचानक समुद्रात आलेल्या जोरदार वाऱ्याच्या झोताने दवणे ह्याच्या पंचाली बोटीच्या अँकरला लावलेला जाडसर दोरखंड तुटून बोट किनाºयावर बांधलेल्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्यात अडकली. बंधाºयातील दगडामुळे बोटीचे नुकसान झाले असून अचानक समुद्रात झालेल्या ह्या बदला बाबत भीती व्यक्त केली जात आहे. शासनासह सहकारी संस्थांनी दवणे ह्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मच्छीमार सहकारी संस्थेचे संचालक तानाजी चौधरी ह्यांनी केली आहे.
समुद्रात मच्छीमारांनी मासेमारीला जाऊ नये अशा प्रकारच्या कुठल्याही सूचना आमच्या कडे आलेल्या नाहीत. - डॉ.नवनाथ जरे, निवासी उपजिल्हाधिकार,पालघर