शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

पदवीप्रवेशासाठी बोर्डीत ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:21 PM

विद्यार्थी-पालक हवालदिल; आॅनलाइनमुळे स्थानिक विद्यार्थ्यांचे हाल, विद्यापीठाकडे लक्ष

बोर्डी : येथील एन. बी. मेहता विज्ञान महाविद्यालयातील पदवीच्या पहिल्या वर्षातील प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी गुरु वारी कॅम्पस बाहेर ठिया आंदोलन केले. मात्र विना अनुदानित तुकडीची मागणी प्रलंबित असल्याने असमर्थता दाखवत, या महाविद्यालयीन प्रशासनाने विद्यपीठाच्या कोर्टात चेंडू टोलवला. दरम्यान सत्ताधाऱ्यांनी पाठ फिरवल्याने तसेच ऐन मोक्याच्या क्षणी शिवसेनेने उडी घेत आंदोलनाची धग प्रखर केली.या महाविद्यालयात यंदाच्या शैक्षणिक वर्षात ५२ आणि गतवर्षी ७८ विद्यार्थी पहिल्या वर्षाच्या प्रवेशापसून वंचित राहिले आहेत. त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता, त्यांना सामावून घेण्याच्या मागणी करिता वंचित विद्यार्थी त्यांचे पालक आणि स्थानिकांनी गुरु वारी सकाळी दहा वाजतापासून आचार्य भिसे विद्यानागरीच्या कॅम्पस बाहेर ठिया आंदोलनाला प्रारंभ करून जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर बारा वाजण्याच्या दरम्यान आंदोलन कर्त्यांच्या शिष्टमंडळाला संस्थेचे विभागीय सचिव प्रभाकर राऊत, प्राचार्या आशा वर्तक आणि प्राचार्या अंजली कुलकर्णी या पॅनलने महाविद्यालयीन प्रशासना तर्फे चर्चेकरिता पाचारण केले. कोणत्याही परिस्थितीत हे प्रवेश झालेच पाहिजेत, शिवाय परराज्यातील विद्यार्थी आणि वशिल्याने मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश बंद करण्याची मागणी शिष्टमंडळाने लावून धरली. मात्र, आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेनुसार अनुदानीत सर्व जागा भरण्यात आल्या असून वंचित विद्यार्थ्यांकरिता १२० जागांची विना अनुदानीत तुकडीची मागणी विद्यापीठाकडे करण्यात आल्याचे प्राचार्या अंजली कुलकर्णी यांनी सांगितले. या वर्षी नॅक प्रक्रि या पूर्ण करूनही विद्यापीठाकडून तुकडी मान्यता रखडण्याचे कारण अस्पष्ट आहे. शिवाय विश्वस्त नितिनभाई मेहेता शिक्षणमंत्र्यांकडे समस्या मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. कॅम्पस बाहेरील आंदोलनकर्त्या विद्यार्थी-पालकांना अन्य आयटी तसेच बायोटेक्नॉंलॉजीच्या रिक्त जागांवर प्रवेश घेण्यासह, त्यांच्या समस्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले.सोमवारी निर्णय?अखेरच्या क्षणी स्थानिक शिवसैनिकांनी उडी घेत, पाठिंबा जाहीर केल्याने आंदोलनाला रंग भरला. सोमवार पर्यंत विद्यापीठाचा निर्णय अपेक्षित असल्याने, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. दरम्यान सत्ताधाºयांनी पाठ फिरवल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांकरिता विद्यापीठाकडे विना अनुदानित तुकडी मान्यतेची मागणी केली आहे. ती मिळाल्यास पुढील प्रक्रि या सुरु करता येईल.-प्राचार्या अंजली कुलकर्णी(एन. बी. मेहेता,विज्ञान महाविद्यालय, बोर्डी)

टॅग्स :Educationशिक्षणVasai Virarवसई विरारscienceविज्ञानcollegeमहाविद्यालयagitationआंदोलन