वाडा : राज्य शासनाने नुकत्याच झालेल्या पेट्रोल, डिझेलवर प्रती लीटर २ रू. करवाढीच्या निर्णयाविरोधात वाडा तालुका काँग्रेस (आय) कमिटीच्या वतीने निदर्शने करून तीव्र निषेध करण्यात आला. या संदर्भात वाडा तहसिलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले.संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना तसेच सर्वसामान्य जनता भाववाढीने त्रस्त झालेली असताना राज्य शासनाच्या पेट्रोल, डिझेल वरील करवाढ ही सर्वसामान्यांना आणखी अडचणीत आणणारी आहे. केवळ मूठभर लोकांच्या हिताच्या दृष्टीने राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. वाडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही पेट्रोल व डिझेल वरील वाढीव कर आकारणीचा निषेध करत असून याचा गांभीर्याने विचार व्हावा आणि झालेली भाववाढ त्वरीत रद्द व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.वाड्यातील खंडेश्वरी नाका येथे वाडा तालुका काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल करवाढीच्या निषेधार्थ घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली व नंतर वाडा तहसिलदार संदिप चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा वाडा काँग्रेसकडून तीव्र निषेध
By admin | Published: October 06, 2015 11:18 PM