जव्हार : शालेय शिक्षण घेत असताना आईचे मायेचे छत्र हरपले, मावशी कडे राहून शिक्षण घेतले, पदवीधर होतानाच मनी खुणगाठ बांधून पोलीस उपनिरीक्षक पदाचा अभ्यास केला. आणि पहील्याच प्रयत्नात दिपाली ने राज्य सेवा परिक्षेत यश संपादन करून, पोलीस उपनिरीक्षक पदाला वयाच्या २३ व्या वर्षीच गवसणी घातली आहे. मोखाड्यातील दिपाली खाडे या आदिवासी युवतीने परिस्थिती वर मात करून, तालुक्यतामध्ये पहीली महिला पोलीस अधिकारी होण्याचा बहुमान मिळविला आहे.दिपाली शाळेत आठवी ला असतांनाच तिची आई देवाघरी गेली. त्यानंतर तिचे संगोपन तिची मावशी जयश्री आणि काका बाबू ढमके यांनी केले. मुळातच अंगी हुशारी, क्रिडा स्पर्धात अग्रेसर राहून स्पर्धा परिक्षेची आवड असलेल्या दिपाली ने दहावी पर्यंत चे शिक्षण मोखाड्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील शाळेत घेतले. पुढे बारावी पर्यंत चे शिक्षण महर्षी रामजी विठ्ठल शिंदे या आश्रमशाळेत घेतले. त्यानंतर पदवीचे शिक्षण नाशिक मधील के. टी. एच. एम. महाविद्यालयात घेतले आहे. पदवीधर होत असतानाच, तिने राज्य सेवा परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक पदाचा अभ्यास सुरू केला. पदवीधर झाल्यानंतर पहील्याच प्रयत्नात दिपाली ही परीक्षा ही उत्तीर्ण झाली आहे.
जिद्दीच्या जोरावर ती बनली पोलीस उपनिरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:02 AM