वसई - आज आषाढ एकादशीच्या निमित्ताने नायगांव पूर्व येथील शांती गोविंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विठू माउली ची दिंडी काढून पांडुरंगाचे दर्शन घेतले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या नामघोषात वाकिपाडा येथील हरिश्चंद्र विठ्ठल पाटील यांनी स्थापना केलेल्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन चंद्रपाडा-वाकिपाडा येथून विद्यालयापर्यंत दिंडी काढली. या विठू माऊली च्या दिंडी सोहळ्यात शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, संस्थेचे विश्वस्त हरेश भोईर, समाजसेवक हिराजी पाटील, विठोबा पाटील, दामोदर पाटील (शाकारी), विद्याधर पाटील तसेच मंदिराचे विश्वस्त प्रभाकर पाटील, संजय पाटील, पालक व इतर मान्यवर सहभागी होऊन त्यांनी या धार्मिक सोहळ्यासाठी सहकार्य केले. एकूणच चंद्रपाडा-वाकिपाडा भागात प्रथमच असा दिंडी सोहळा पाहून ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अपार कौतुक केले.
शांती गोविंद हायस्कूलचे विद्यार्थी बनले वारकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 8:36 PM