हुसेन मेमनजव्हार : भारतीय विद्यापीठाचे संस्थापक व कुलपती डॉ पतंगराव कदम, त्यांचे चिरंजीव कार्यवाह डॉ विश्वजित कदम यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांनी वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणा-या गुणवंतांचा सत्कार केला. तसेच विज्ञान संशोधन आणि शैक्षणिक प्रकल्प स्पर्धांत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या मॉडेल्सचे प्रदर्शन भरविले होते.
इंग्रजी शाळेत भरविलेल्या या भव्य प्रदर्शनाचे उदघाटक माजी नगराध्यक्ष दिलीप तेंडुलकर होते. इंग्रजी माध्यम शाळेचे मुख्याध्यापक दिपक महाडिक हे प्रमुख पाहुणे होते. यांनीही सर्व मान्यवर आणि विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले. भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यमिक शाळेत भरविलेल्या भव्य प्रदर्शानावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी तारपा नृत्य, थोर नेत्यांची व्यक्तिरेखा, पथनाट्य, वारली पेंटिंग, चित्रकला, स्पॉटपेन्टिंग, बाहुलीकाम, विज्ञान साहित्य, शैक्षणिक प्रकल्प, राखी मेकिंग ग्रीटिंगकार्ड, अशा चिजा प्रदर्शनात मांडल्या होत्या. त्यांनी मान्यवरांची मने जिंकली.हे प्रदर्शन भव्य आणि उत्तम असल्याचे पालकांनी सांगितले. या विद्यार्थ्यांनी वर्षभरात प्रत्येक क्षेत्रात केलेल्या मेहनतीचे दर्शन यातून घडत होते. यावेळी आयोजिलेल्या बहुरंगी , सांस्कृतिक कार्यक्रमात शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. प्रदर्शन व सोहळ्यास मान्यवर, विद्यार्थी आणि पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. व प्रदर्शनाचा कार्यक्र म मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शिक्षकांनी अत्यंत मेहनत घेतली होती. त्यांचेही कौतुक करण्यात आले.