वसई : जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे पिडलेल्या वसई पूर्वेतील नारिंगी वासियांना शासकीय अधिकाऱ्यांच्या संवेदनाशुन्य कारभारामुळे तासंतास रांगेत उभे राहण्याचा प्रकार बुधवारी (५ जुलै) घडला आहे. वास्तविक शासकीय आदेशानुसार सरकारी अधिकाºयांनी पीडितांच्या घरोघरी जाऊन त्यांना मदतीचा धनादेश देणे अपेक्षित होते.वसई पूर्वेतील नारंगी गावच्या शेकडो ग्रामस्थांना ग्रामस्थांचे वसई महसूलच्या पथकाने दोन महिन्यापूर्वी पंचनामे पूर्ण केले. मात्र, इतका मोठा आर्थिक फटका बसून देखील दोन महिने उलटले तरीही शासन आदेश झुगारून मदतीच्या नावाने गोरगरिबांना आदल्या दिवशी टोकन नंबर देत त्यांना तासंनतास रांगेत उभे करीत पीडितांना मदतीच्या धनादेशाचे वाटप केल्याचा गंभीर प्रकार नारंगी विभागातील तलाठ्याने विरार कार्यालयात केला आहे. शासन आदेशानुसार वसईतील पीडित पूरग्रस्त नागरिकांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यावर त्या- त्या विभागवार तलाठी व मंडळ अधिकाºयांनी थेट या पीडित पूरग्रस्तांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना मदतीचे धनादेश वाटप करण्याचे शासन आदेश आहेत ,मात्र नारंगी विभागातील तलाठी गायकर यांनी विरार तलाठी कार्यालयाबाहेर ५ सप्टेंबर रोजी ग्रामस्थांना धनादेश घेण्यासाठी आदल्या दिवशी गावात टोकन नंबरचे वाटप केले होते. दरम्यान येथे केवळ यादीतील ८० ते ८५ टक्के पीडितांनाच हे धनादेश मिळाले, तर उरलेल्यांना माघारी फिरावे लागले.अजूनही काहींना मदतीचे धनादेश नाहीत?वसईच्या अजूनही काही विभागात मदतीचे धनादेश देणे शिल्लक असताना असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी वसई प्रांत व तहसीलदार यांनी या घडल्या प्रकारची विशेष नोंद घेणे आवश्यक असून पुन्हा एकदा आपले सरकार म्हणून गतिमान महसूल प्रशासन हे कसे आहे हेच या महसूलच्या गलथान प्रकारावरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.वसई महसूल पथकाने तालुक्यात जवळपास साडेअकरा हजारहुन अधिक पंचनामे पूर्ण केले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ९५ टक्क्याहून अधिक मदतीचे धनादेश वाटप केले असून अजूनही साधारण सहाशे ते साडेसहाशे धनादेशाचे वाटप होणे शिल्लक आहे. - किरण सुरवसे, तहसीलदार
नुकसान भरपाईसाठी पीडित नारंगी ग्रामस्थ तासंतास रांगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 3:46 AM