राहुल वाडेकर विक्रमगड : तालुक्यातील झडपोली येथील शासकीय तंत्रिनकेतन मधील अजय लाटे या १८ वर्षीय विद्यार्थ्यांनी १५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.मॅकेनिकल पदविकेच्या दुसºया वर्षाला असणारा अजय लाटे हा शहापूर तालुक्यातील आपटे या गावाचा रहिवासी होता. शिक्षणासाठी मागील वर्षापासून तो झडपोली येथील कॉलेजच्या बाजूलाच खोली भाड्याने घेऊन मित्रांबरोबर राहत होता. तो अभ्यासात अतिशय हुशार होता. १०वी मध्ये ९१ टक्के मार्क मिळविणाºया अजयने मॅकेनिकलच्या डिप्लोमाला विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेतला होता.प्रथम वर्षात त्याने ८२ टक्के माकर्समिळवून तो अव्वलही आला होता. सध्या परीक्षा चालू असल्याने तो रूमच्या बाजूला असलेल्या परिसरात अभ्यासासाठी गेला होता. त्यानंतर तो रूममध्ये येऊन झोपल्यानंतर खूप त्रास होऊ लागल्याने त्याच्या मित्रांनी त्याला त्वरीत शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती खालावल्याने १०८च्या अॅम्ब्युलन्सने त्याला ठाणे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला.अभ्यासात अतिशय हुशार असणाºया अजयने विष प्राशन करून आपले जीवन संपविण्या मागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र काही दिवसांपासून तो थोडा एकटा-एकटा राहत असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. वयात येणाºया मुलांच्या आत्महत्येच्या अशा घटनेने पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.>त्याला चांगले गुण मिळाले असल्याने त्याच्या आत्महत्येमागे प्रेमप्रकरणाचे कारण असावे काय? या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. परंतु अद्याप त्यादृष्टीने कोणतेही धागेदोरे अद्याप हाती लागलेले नाही.
शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 2:17 AM