शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नागपूर अधिवेशनात करणार आत्महत्या, सेवानिवृत्त पोलिसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 3:39 AM

पोलीस दलात अंमलदार म्हणून कार्यरत असलेले व सध्या स्वेच्छानिवृत्ती घेतलेले दत्तात्रेय नाईक हे मागील २५ वर्षा पासून सरकारी नोकरा तर्फे बचाव प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत.

पालघर : आपल्या कार्यालयात चौकशी साठी बोलावून आपल्याला बास्टर्ड म्हणून शिवीगाळ करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी निमित्त गोयल ह्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करून ३ महिने झाले तरी अप्पर पोलीस अधीक्षकांनी त्यांच्यावर कुठलीही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ तक्रारदार सेवानिवृत्त पोलीस दत्तात्रेय नाईक यांनी विधीमंडळाच्या अधिवेशन काळात नागपूरला जाऊन आपण आत्महत्या करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या ‘आपले सरकार’ पोर्टल वर पत्र पाठवून दिला आहे.पोलीस दलात अंमलदार म्हणून कार्यरत असलेले व सध्या स्वेच्छानिवृत्ती घेतलेले दत्तात्रेय नाईक हे मागील २५ वर्षा पासून सरकारी नोकरा तर्फे बचाव प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. ६ एप्रिल रोजी अधिकारी गोयल यांनी बोलविल्या प्रमाणे नाईक हे कसुरदार असलेल्या पोलीस उपनिरीक्षक उगले आणि शिपाई धोडी यांच्या सोबत त्यांच्या कार्यालयात हजर होते. यावेळी तू ज्यादा शाना बनता है, झूट बोलेगा तो फोर्जरी का केस बनाके अंदर डाल दूँगा अशी धमकी देऊन, यू बास्टर्ड अशी शिवी दिल्याची तक्र ार त्यांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य वरिष्ठांकडे केली होती. मात्र आपण असे अर्वाच्य शब्द कधी वापरत नाही असे सांगून विभागीय चौकशीतून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न नाईक हे करीत असल्याचा दावा गोयल यांनी केला आहे.विभागीय चौकशीच्या नियमानुसार कसुरदार व बचाव प्रतिनिधी यांच्या समक्ष जबाब नोंदविणे गरजेचे असतांना नियम धाब्यावर बसवून कसूरदार व माझा न्यायहक्क हिरावून घेतल्याचा आरोप ही त्यांनी आपल्या तक्र ारीत केला होता.ह्या प्रकरणाचे संतप्त पडसाद पोलिसात उमटले होते.ह्या प्रकरणाची आपण चौकशी करणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण ह्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले होते.मात्रनाईक म्हणतात, पोर्टेलवरून आपल्याला मिळाला रिप्लायया घटनेला ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतरही आपल्या तक्रारीची कुठलीही दखल घेतली जात नसल्याने आपल्याला मोठा मनस्ताप झाला असून आपण आपल्या खिशात सुसाईड नोट लिहून अधिवेश काळात नागपूरला जाऊन आत्महत्या करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या ’आपले सरकार’पोर्टलवर त्यांनी दिला आह.े . हे इशारा पत्र नोंदवून घेण्यात आल्याचा रिप्लाय ही आपल्याला प्राप्त झाल्याचे दत्तात्रेय नाईक यांनी लोकमतला सांगितले. अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण ह्यांच्या मोबाईल वर प्रतिक्रि येसाठी अनेक वेळा संपर्क साधूनही त्यांनी तो उचलला नाही.

टॅग्स :Policeपोलिस