राहुल वाडेकर
विक्रमगड : कष्टप्रद आणि त्रासाची ठरत असल्याच्या सबबीखाली शेती करण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे गावातील पडिक क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र काही गावांतील शेतकºयांचा शेती हाच श्वास असल्याने शेतीसाठी ते काहीही करायला सदैव तत्पर असतात. विक्रमगड तालुका हा भात लागवडीत प्रमुख आहे. सिंचनाच्या विशेष सुविधा उपलब्ध नसतानाही खरिपात तर भात लागवड होतेच, परंतु उन्हाळी हंगामात सुद्धा मुहू खुर्द लघु पाटबंधारा व खांड लघु पाटबंधाºयाच्या पाटाच्या पाण्यावर सजन, झडपोली, खांड, वाकडूपाडा गावात भातपिकाची लागवड करून येथील प्रयोगशील शेतकरी भाताचे उत्पादन घेत आहेत.
या वर्षी तालुक्यात अवकाळी पावसाने भातपिकाची पुरती वाट लावली. त्यात भातपिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांचे भातपिकाचे ५० टक्के उत्पन्न घटल्याने लागवडीचा खर्चही निघाला नाही. पीककर्ज कसे फेडायचे या चिंतेत असतानाच आपले मनोबल खचू न देता पुन्हा उभारी घेत झडपोली, सजन गावातील शेतकºयांनी उन्हाळी भात शेतीची लागवड केली आहे.झडपोली, सजन गावातील प्रयोगशील शेतकरी सेवक सांबरे, अंकुश सांबरे, नरेश सांबरे, शरद सांबरे, श्रीधर सांबरे, सुभाष सांबरे, रमेश सांबरे, नारायण सांबरे, मधुकर सांबरे, पंडित सांबरे अशा अनेक शेतकºयांनी आपल्या शेतात उन्हाळी हंगामात भाताचे पीक घेतले आहे. त्याकरिता त्यांनी वर्षानुवर्ष भात लागवडीच्या अनुभवाच्या जोरावर शेतात सुधारित पद्धतीने भातपिकाची केली आहे.उन्हाळ्यात उत्पादन अधिकच्पावसाळी हंगामात जुलै व आॅगस्ट महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश काळ कमी असतो. या उलट उन्हाळी हंगामात भातपिकाच्या वाढीच्या काळात म्हणजेच जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश भरपूर असतो. त्यामुळे खतास प्रतिसादजास्त असतो.च्उन्हाळी हंगामातील जास्त तापमान व कमी आर्द्रतेचे प्रमाण यामुळे प्रतिकूल हवामानामुळे पावसाळी भात पिकापेक्षा रोगांचे प्रमाण कमी राहते. उन्हाळी हंगामात भातपिकाची उंची पावसाळी पिकापेक्षा कमी असते. तसेच पावसाळी भातापेक्षा उन्हाळी भातात तांदळाचे प्रमाण अधिक असते.या वर्षी तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे पावसाळी भातपिकाचे मोठे नुकसान झाले असून पीक कर्जे कशी फेडायची ही चिंता शेतकºयांना असताना मोठी हिंमत करून उन्हाळी भात पिकाची लागवड आम्ही केली आहे.- सुभाष सांबरे, शेतकरी, सजनगाव.स्थानिक जातीची लागवड : उन्हाळी भात लागवडीसाठी स्थानिक जातींबरोबरच कर्जत १८४, कर्जत ३, कर्जत ४, रत्नागिरी, रत्ना, सह्याद्री, पालघर- १ आदी साडेतीन ते चार महिन्यात तयार होणाºया जाती वापर केला आहे.