शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

वैभव राऊतच्या पाठिंब्यासाठी रविवारी सभा; हिंदुत्ववादी संघटनांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 11:16 PM

मागील वेळी अशाच आंदोलनाचा उडाला होता फज्जा

नालासोपारा : मुंबई एटीएस ने अटक केलेल्या वैभव राऊत याला पाठींबा दर्शविण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरून हिंदू गोवंश रक्षा समिती आणि हिंदत्वुनिष्ठ संघटनांकडून ३ फेब्रुवारीला पाटणकर पार्क येथील रायन इंटरनॅशनल शाळेच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात संध्याकाळी ५.३० च्या दरम्यान हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे.याकरिता शहरातील मुख्य नाक्या नाक्यावर बॅनर लावण्यात आले असून त्यात वैभव राऊत याचाही फोटो टाकला असून त्याला पाठींबा दर्शवण्यासाठी सभा आहे का अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. या सभेमध्ये वैभव राऊत याची केस हाताळणारे व जातीने लक्ष घालणारे सुप्रसिद्ध वकील संजीव पुनाळेकर येणार असल्याची माहिती समनवयक दिप्तेश पाटील यांनी दिली असून या सभेत ते काय बोलणार याकडे पोलिसांचे लक्ष असणार आहे. गोरक्षा करणाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात कोण अडकवतो तसेच वैभव राऊतला खोट्या गुन्ह्यात मुंबई एटीएसने कसे अडकवले याबद्दलही ते बोलणार असल्याचे कळते. या सभेसाठी पोलिसांकडे नॉर्मल अर्ज केलेला असून कोणतीही रीतसर परवानगी मागितली नाही. नालासोपारा पोलिसांनी या सभेसाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. वैभव राऊत याची केस सांभाळणारे वकील संजीव पुनाळेकर येणार असल्यामुळे अनेक हिंदू संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गोवंश रक्षा समिती आणि हिंदूत्वनिष्ठांनी केले आहे.अटकेनंतर नालासोपाऱ्यात आतापर्यंत काय काय घडलेवैभव राऊत याला अटक झाल्यानंतर कारवाई खोटी केली त्याला नाहक यात गोवले असल्याचा आरोप करत अनेक हिंदुत्ववादी संघटना, भंडारआळी, बजरंग दल यांनी अंदाजे ५ हजार लोकांची रैली १८ ऑगस्ट २०१८ ला काढली.त्यात दहशतवाद विरोधी पथकाची सीबीआय कडून चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. नंतर ९ सप्टेंबर २०१९ ला पुन्हा सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत हिंदू धर्मजागृती सभेने हिंदू विरोधात होणाºया कारवाई संदर्भात आणि खोट्या गुन्ह्यात वैभव राऊतला फसवले म्हणून जाहीर जनसंवाद सभेचे आयोजन केले होते.आता ४ महिन्यानंतर हिंदू धर्मजागृती सभेने ३ फेब्रुवारी २०१९ ला सभेचे आयोजन केले आहे. नालासोपाºयाच्या मुख्य मुख्य नाक्यावर लावण्यात आलेल्या सभेच्या पोस्टरमध्ये वैभव राऊत याचा फोटो वापरलेला आहे.काय आहे हे प्रकरण१० ऑगस्ट २०१८ रोजी मुंबई एटीएसने वैभव राऊत याच्या घरावर छापा घालून गावठी पिस्तूले ५, अर्धवट तयार गावठी पिस्तुले ३, ९ एम एम राऊंड ११, ७.६५ एम एम राऊंड ३०, शस्त्रांचे अनेक सुटे भाग उदा. स्प्रिंग, ट्रिगर, २२ गावठी बॉम्ब आणि ५० गावठी बॉम्ब तयार होतील इतकी स्फोटके, बॅटºया, डिटोनेटर्स असे साहित्य जप्त केले असल्याचे सांगून त्याला एटीएसने अटक केलीहोती.पोलीस स्टेशनला साधा अर्ज केला असून अद्याप पर्यंत त्यांना सभेसाठी परवानगी दिलेली नाही. सभेला कोणी येणार असल्याची माहिती मिळाली नसून २०० ते ३०० लोक सभेला येतील असा आमचा अंदाज आहे.- के. डी. कोल्हे, पोलीस निरीक्षक,नालासोपारा पोलीस स्टेशनपोलिसांच्या परवानगीची गरज नसून अर्ज केलेला आहे तसेच महानगरपालिकेच्या मैदानावर होणाºया सभेसाठी ध्वनी आणि जागेची मनपाकडून रीतसर परवानगी घेतलेली आहे. वैभव राऊत हा हिंदू गोवंश रक्षा समितीचा सदस्य असल्यामुळे बॅनरवर त्याचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे.- दिप्तेश पाटील, समनवयक, हिंदू गोवंश रक्षा समिती

टॅग्स :Nalasopara Arms Haulनालासोपारा शस्त्रसाठा