शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

सूर्यफूल शेती ठरतेय शेतकऱ्यांना वरदान, पालघरमध्ये बळीराजाचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 9:51 AM

पालघरमधील प्रगतशील शेतकऱ्यांनी धरली आधुनिकतेची कास

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : पालघर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरत सूर्यफूल लागवड करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये जव्हार, विक्रमगड, पालघर व डहाणू तालुक्यातील शेतकरी हा प्रयोग साधत आहेत. याकरिता ‘बायफ’ म्हणजेच भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाऊंडेशनकडून मोलाचे मार्गदर्शन लाभत असून, शेतकऱ्यांना तीन महिन्यात प्रत्येकी पाच हजार रुपयांपर्यंत उत्पादन मिळाले आहे.

आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘बायफ’ विविध पद्धतीने काम करते व कार्यक्रम राबवते. याच कार्यक्रमांचा एक उपक्रम म्हणून २०० हून अधिक शेतकऱ्यांंना प्रत्येकी सात गुंठेेकरिता ५०० ग्रॅम बियाणे देऊन मार्गदर्शन केले. त्यात सूर्यफूल, मोहरी, करडई, तीळ यांसारख्या तेलबियांचे उत्पादन मुख्य वा मिश्र पिके घेण्यास सुरुवात केली आहे. भात कापणीनंतर शेतातील उरलेल्या ओलाव्यावर पिके घेण्यास मोठा वाव आहे. परिसंस्थेच्या, जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिकोनातून मोहरी, करडई आणि सूर्यफूल यांसारख्या तेलबिया, जमिनीत असलेल्या ओलाव्यावर पेरणी किंवा टोकन पद्धतीने भाजीपाला पिकांमध्ये आंतर पीक म्हणून घेतले जात आहे.

सूर्यफूल हे हिवाळी व उन्हाळी या दोन्ही हंगामात घेता येऊ शकते. कापणीपर्यंत थोड्या - अधिक प्रमाणात सिंचनाची आवश्यकता असते. आदिवासी शेतकऱ्यांनी रस घेऊन तेलबियांची काळजीपूर्वक लागवड केली. एकात्मिक कीड व्यवस्थापनामुळे कीड नियंत्रणात आणि शेतातील फायदेशीर कीटक वाढण्यास मदत होते. रासायनिक कीटकनाशकावर होणारा खर्चही कमी होऊ शकतो. पालघर, जव्हार, विक्रमगड आणि डहाणू तालुक्यातील शेतकरी या पद्धतीचा उपयोग करत आहेत. ‘महाराष्ट्र बायफ’चे मुख्य कार्यक्रम अधिकारी सुधीर वागळे यांच्या मार्गदर्शनाखाली, विनोद बोरसे, किरण भागडे, पंकज परदेशी, संतोष आगळे, नितीन भोये या ‘बायफ’च्या जव्हारमधील टीममार्फत अंमलबजावणी झाली.

२०० शेतकऱ्यांच्या शेतात प्रयोग२०० शेतकऱ्यांना सात गुंठे जागेत ५०० ग्रॅम बियाणे देण्यात आले. तीन महिन्यात उत्पन्न येत प्रत्येकी ५० किलोग्रॅम तेलबियांचे उत्पन्न निघाले. त्या तेलबियांतून प्रत्येक शेतकऱ्याने तेल काढल्यानंतर २५ किलो सूर्यफुलाचे तेल उत्पादित झाले. प्रत्येकी २०० रुपये किलोच्या हिशोबाने प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येकी पाच हजार रुपये मिळाल्याने ‘बायफ’कडून एक चांगला प्रयोग यशस्वी झाला.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरारFarmerशेतकरी