कासा : डहाणू तालूक्यातील गावांना उन्हाळ शेतीला पाणी पुरविणाऱ्या सूर्या धरणाच्या कालव्यांमध्ये साठलेल्या गाळ व कचºयामुळे त्यांना कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आदिवासी भागातील, डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्यातील गावांना उन्हाळ्यात शेतीसाठी कालव्याने पाणीपुरवठा केला जातो. या मध्ये डहाणू तालुक्यातील सूर्यानगर, वाघाडी, सोनाळे, खानीव, वेती, वरोती, तवा, पेठ, धामटणे, चारोटी, कासा, सारणी, निकावली, उर्से, साये, रानशेत, साखरे, गोवणे, घोळ, ऐना, दाभोण, वधना आदी तर पालघर तालुक्यातील सोमटा, बºहाणपूर आंबेदा, नानिवली, आकेगव्हान, चिंचारे, रावते, शिगाव, कुकडे, महागाव, गारगाव, वाळवे, गुंदले आदी सुमारे १०० गावांतील शेतीला पाणी पुरविले जाते.
सिंचन या प्रमुख उद्देशाने हे धरण बांधण्यात आले होते. या कालव्यातून १४ हजार ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात आली आहे. दरवर्षी १५ डिसेंबरपासून कालव्यातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र गाळ, कचरा, दगड मोठ्या प्रमाणात मुख्य कालव्या प्रमाणेच उप कालव्यामध्ये साचले आहे. त्याची साफसफाई न करता यंदाही डाव्या कालव्यातून ८ डिसेंबरला पाणी सोडले. उजवा कालवा काही ठिकाणी नादुरुस्त झाला होता. त्याची फक्त एक दोन ठिकाणी तात्पुरती दुरु स्ती करून १३ डिसेंबरपासून पाणी सोडले. मात्र ८ डिसेंबरला डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी अद्याप गावांपर्यंत पोहोचलेले नाही. बºयाच वेळा सफाई व गाळ काढण्याचे काम न करता बिले काढली असे आरोप केले जातात. त्यामुळे २००९ पासून या कामांना मंजुरी दिली जात नाही. व ती हातीही घेतली जात नाहीत. त्यामुळे यापुढे गाळ कचरा काढण्याची कामे शासनाच्या यांत्रिकी विभागामार्फत केली जातील असे जलसंपदाचे अधिकारी सांगतात.मशिनरीच्या सफाईला मर्यादाच्यांत्रिकी विभागाच्या या मोठ्या मशिनरी फक्त मुख्य कालव्यात काही ठिकाणीच उतरवून साफसफाई करता येते. ती सर्व ठिकाणी होऊ शकत नाही. आणि उप कालवे, शेतीला पाणीपुरवठा करणारे लहान कालवे या मध्ये तर ती उतरवता येत नाही. त्यामुळेच गाळ काढला गेला नाही.