शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

भूकंपप्रवण क्षेत्रात सर्वेक्षणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 11:06 PM

डहाणू, तलासरी परिसर : शंभर कर्मचाऱ्यांचे पथक

डहाणू : डहाणू आणि तलासरी तालुक्यातील गावांना दहा महिन्यांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. २५ जुलै रोजी ३.८ रिश्टर स्केल क्षमतेचा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का बसल्याने, काही घरांना लहान - मोठे तडे गेले आहेत. भूकंप झालेल्या गावातील शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्यकेंद्र, अनुदानित आश्रम शाळा, शासकीय कार्यालये, तसेच गाव पाड्यांतील घरांचे सर्वेक्षण करण्यासाठी, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, यांनी तलाठी, ग्रामसेवक, शाखा अभियंते, यांच्या नेतृत्वाखालील शंभर सरकारी कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले असून, त्यांनी सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात केली असहे. त्यामुळे भुकंपाने नुकसान झालेल्या लोकांना नुकसानभरपाई मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.ज्या भूकंपप्रवण क्षेत्रात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे, त्यांत धुंदलवाडी, सासवंद - तलोठे, चिंचले, नागझरी- मोडगाव, आंबेसरी, गांगणगाव, धामणगाव, बहारे, वंकास, हळदपाडा, मोडगाव, दापचरी, आंबोली, शिसणे, धानिवरी, ओसरवीरा, विवळवेढे, निंबापुर - बांधघर, सायवन, चळणी, वडवली- सवणे, करंजगाव, कवाडा, झरी, वसा, तलासरी (नगरपंचायत), कुरझे, सूत्रकार, उधवा, वेवजी, या ग्रामपंचायतींचा समावेश असून, त्यात ५२ गावांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.दहा महिन्यांपासून भूकंपाचे धक्के बसत असून, त्यांत आतापर्यंत लहान - मोठे असे सुमारे दोन हजार भूकंपाचे धक्के बसल्याचे जाणवले आहे. या भूकंपप्रवण क्षेत्रात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे सासवंद, गांगोडी, शिसणे, ऐने, धनिवरी, तलासरी, उधवा, कवाडा, येथे भूकंपमापक यंत्र बसवली आहेत.भूकंपाचे सत्र सुरू होताच, खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची टीम येथे तब्बल आठ महिने कार्यरत होती. मात्र हे भूकंपसत्र थोडे कमी झाल्याने ती माघारी पाठवण्यात आली. आता पुन्हा या भूकंप प्रवण क्षेत्रातील गावांत जनजागृती करण्यासाठी सिव्हिल डिफेन्सची तुकडी तैनात केली आहे.तहसीलदारांची माहितीभूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या वैभवी भुयाळ आणि रिशा मेघवाले यांना शासनामार्फत प्रत्येकी चार लाख अशी मदत देण्यात आली आहे. घरांचे आणि अन्य नुकसान झालेल्या एक हजार ६९ लोकांना प्रत्येकी सहा हजार प्रमाणे एक कोटी १४ हजार रुपयांची मदत दिली.

टॅग्स :Earthquakeभूकंप