डहाणू : मागील दोन महिन्यांत झालेल्या भूकंपांची मालिका अजूनही संपलेली नाही. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्याच्या अनेक भागात मागील काही दिवस भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्यामुळे या परिसराची पाहणी करण्यासाठी भारतीय भूगर्भशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांचे पथक ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत या भागात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.भूकंपाच्या धक्क्याबाबत लोकांच्या मनात भीती आणि दहशत निर्माण होऊ नये यासाठी असे धक्के बसल्यास कोणती काळजी घ्यावी, काय करावे आणि काय करू नये याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे अजूनही या परिसरातील नागरिकांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येते आहे. बुधवारी आमदार अमित घोडा, पास्कल धनारे, सहायक जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, तहसीलदार राहुल सारंग आदींच्या उपस्थितीत नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विशाल नातेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुंदलवाडी येथील आश्रमशाळेत भूकंपाबाबत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.>भूकंप प्रवणक्षेत्र वाढणार?>हितेन नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यात मागील १ वर्षांपासून जव्हारच्या वाळवंडा पासून सुरू झालेले भूकंपाचे धक्के आता तलासरी, डहाणू-बोर्डी पर्यंत विस्तारले आहेत. नियोजनबद्ध विकासाच्या नावाखाली एमएमआरडीए ला आपले क्षेत्र डहाणू पर्यंत विस्तारण्याची संधी बिल्डर धार्जिण्या गटाने मिळवून दिली आहे. या सिमेंटच्या विकासा सोबतच वाढवणं बंदर व, जिंदाल जेट्टीच्या निर्मिती साठी लागणाऱ्या दगड, डबर, रेती, साठी पर्यावरणाचे रक्षक असलेले मोठ मोठे डोंगर फोडले जाणार असल्याने भूकंपाचे धक्के सर्वत्र पसरून तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला धोका पोहचण्याची शक्यता आहे.>याचा फटका बसणार : वाढवण बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात २२ मीटर्स खोल,२ किलोमीटर्स रुंद आणि ८ किलोमीटर्स लांब असा भराव टाकला जाणार असून त्यासाठी २५ लाख टन डबर लागेल. त्यामुळे एमएमआरडीए ची कामे, ४४० हेक्टवर उभारण्यात येणाºया इमारती, वाढवणं, बंदर जिंदाल जेट्टी उभारणीसाठी लागणाºया साहित्यासाठी डोंगर फोडावे लागणार आहे. तर दुसरीकडे प्रस्तावित धरणात मोठा पाण्याचा साठा साठविण्यात येणार असल्याने एक बाजूला डोंगराची साखळी तोडली जाणार असून भूपृष्ठावर पाण्याच्या साठ्यांचा प्रचंड भार पडणार आहे. त्यातून कोणता अनर्थ उद्भवेल हे काळच सांगू शकेल.
भूकंपक्षेत्राची मंगळवारी पाहणी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:52 AM