शशी करपे/लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई विरार आणि मीरा भाईंदर महापालिका हद्दीत सूर्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचे कंत्राट मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने लार्सन अँड टुब्रोला दिले आहे. हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याची अट घालण्यात आली असून ती पूर्ण झाल्यावर वसई विरार महापालिकेला दररोज १८५ एमएलडी आणि मीरा भाईंदर महापालिकेला दररोज २१५ एमएमलडी पाणी पुरवठा होणार आहे. वसई विरार आणि मीरा भाईंदर महापालिकेसाठी एमएमआरडीए स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबवणार आहे. त्यांना सूर्या धरणातून पाणी पुरवठा करणार आहे. त्यासाठी तीन कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यात लार्सन अँड टुब्रोची सर्वात कमी दराची असल्याने मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही कंपनी उदंचन, जलप्रक्रिया , जल शुद्धीकरण केंदे्र आणि प्रयोगशाळा बांधणार आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग ८ च्या बाजूने ८८ किलोमीटर लांब जलवाहिनी टाकणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रसाठी एमएमआरडीएने सूर्या वसाहतीची जागा सरकारकडून घेतली आहे. त्याठिकाणी मेंढवण खिंडीतून बोगदा तयार करून पाणी आणले जाईल. त्यानंतर पाईपलाईनने पाणी वसई विरार आणि मीरा - भाईंदर महापालिकेच्या हद्दीपर्यंत पोचवले जाणार आहे. तिथून पुढे पाण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित महापालिकांची असणार आहे. या योजनेसाठी एकूण १ हजार ३२९ कोटी खर्च येणार आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर वसई विरार महापालिकेला दररोज १८५ एमएलडी आणि मीरा भाईंदर महापालिकेला दररोज २१५ एमएलडी पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिकांच्या हद्दीतील पाणी समस्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे. सूर्या पाणी पुरवठा योजनेसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने जलवाहिनी टाकण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि खाडी व नदी ओलांडून जलवाहिनी टाकण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची परवानगी घेण्यात आली आहे. पर्यावरण खात्याकडून सीरआरझेड व दिवा-वसई रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्यासाठी मध्य रेल्वेची परवानगी मिळवण्यातही एमएमआरडीएने यश मिळवले आहे. त्याचबरोबर प्रकल्पासाठी विद्युत पुरवठा करण्याकरता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचीही परवानगी घेण्यात आलेली आहे. पाणी पुरवठा योजनेतील संभाव्य अडथळे आधीच दूर करण्यात आल्यामुळे ही योजना तीन वर्षात पूर्ण करण्याचे बंधन ठेकेदार कंपनीला घालण्यात आले आहे. त्यामुळे या दोनही महानगरांची पाणीसमस्या सुटणार आहे.विरोधाचे काय करणार?काहीही झाले तरी सूर्या धरणातील पाण्याचा एक थेंबही वसई-विरार व मीरा भार्इंदरला जाऊ देणार नाही. हा सिंचन प्रकल्प असून आधी त्यावर अवलंबून असलेल्या जमिनीचे सिंचन करा अन्यथा, संघर्ष उद्भवेल असा इशारा दिला गेला आहे. त्याचे काय करणार?
सूर्या पाणी योजनेचे कंत्राट एल अॅण्ड टी ला
By admin | Published: May 30, 2017 5:17 AM