लोकमत न्यूज नेटवर्क
वसई :वसई पूर्वेस गोखीवरे चिंचपाडा स्थित क्लासिक कंपनी जवळ बुधवार (दि.६ ) ऑक्टोबर रोजी सकाळी सुर्याची मुख्य जलवाहिनी फुटल्याने तिच्या दुरुस्तीचे काम वसई विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाने गुरूवारी सकाळी ९ वाजता हाती घेत ते जवळपास १२ तासांच्या अथक प्रयत्नाने गुरुवारी रात्रीच पूर्ण केले
दरम्यान या काळात वसई पूर्व पश्चिम नवघर मणिकपूर शहर,वसई गाव आणि वालीव प्रभागातील भागात सूर्याचा मुख्य जल वाहिनीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता मात्र १२ तासांच्या दुरुस्ती नंतर शुक्रवारी पहाटे म्हणजेच जवळपास २४ तासांनी तो सुरळीत व पूर्ववत करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रकाने लोकमत ला दिली.
बुधवारी गोखीवरे चिंचपाडा येथे जलवाहिनी ला गळती लागल्या चे त्यावेळी गावकऱ्यांनी वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला तक्रार केल्यावर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गानी धाव तर घेत ली मात्र बुधवारी काम शक्य नसल्याने ते गुरुवारी सकाळी ९ वाजता तिच्या दुरुस्तीचे काम सुरू केलं होतं व हे काम रात्री 10 वाजता पुर्ण झालं
दरम्यान या दुरुस्तीच्या काळात वसईतील पूर्व पश्चिम भागातील पाणीपुरवठा बंद वजा विस्कळीत झाला होता मात्र आता शुक्रवारी सकाळी जवळपास 24 तासांच्या नंतर येथील पाणीपुरवठा हळूहळू पूर्ववत होईल असे ही पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केलं