शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

निलंबित अभियंत्यांची महापालिकेत ऊठबस

By admin | Published: February 17, 2017 12:14 AM

बिल्डरांसोबत दारु पार्टी झाडल्यामुळे निलंबित केलेल्या काही ठेका अभियंत्यांची महापालिकेत पुन्हा उठबस सुुरु झाली आहे. चौकशीचा

शशी करपे / वसई बिल्डरांसोबत दारु पार्टी झाडल्यामुळे निलंबित केलेल्या काही ठेका अभियंत्यांची महापालिकेत पुन्हा उठबस सुुरु झाली आहे. चौकशीचा फार्स उरकून अभियंत्यांना पुन्हा कामावर घेण्याच्या हालचाली सुुरु असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. वसई विरारमध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डर्ससोबत महापालिकेच्या इंजिनिअर्सनी दारु पिऊन डान्स केल्याचा व्हिडिओ ५ फेब्रुवारीला व्हायरल झाला होता. महापालिकेतील स्वरुप खानोलकर या (मुख्य अभियंता अनधिकृत बांधकाम) ठेका इंजिनिअरच्या बर्थ डे पार्टीचे २४ जानेवारीला विरारच्या एका रिसॉर्टमध्ये आयोजन करण्यात आलें होतें.पार्टीत नरेंद्र संखे, योगेश सावंत, रोशन भागात, केयूर पाटील, प्रवीण मुळीक, निनाद सावंत, कौस्तुभ तामोरे, निलेश मोरे, इंद्रजीत पाटील, परमजीत वर्तक, युवराज पाटील यांनी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांसोबत मद्यधुंद नाच केल्याचे व्हिडिओत दिसत होते. विशेष म्हणजे येथे फटाक्यांची आतषबाजी , डीजे होता , विदेशी मद्यही होते. वसईच्या समुद्रकिनारी रात्री उशीरापर्यंत ही जंगी पार्टी सुरु होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आयुक्त सतीश लोखंडे यांनी या बाराही ठेका अभियंत्यांना निलंबित केले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसातच यातील बरेचसे ठेका अभियंते पुन्हा महापालिकेच्या मुख्यालयात येऊन बसू लागले आहेत. विशेष म्हणजे आपल्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये ते बसू लागले आहेत. काही जणांनी तर अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डरांच्या पुन्हा गाठीभेटी घेणेही सुरु केल्याचे दिसत आहे. निलंबित अभियंत्यांचा महापालिकेच्या मुख्यालयात खुलेआम सुुरु असलेला वावर अनेकांच्या भुवया उंचावत आहे. महापालिकेत कायमस्वरूपी अधिकारी असतांना अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे अधिकार आयुक्त लोखंडे यांनी ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या खानोलकरकडे दिले होते. तो आयुक्त लोखंडे आणि उपायुक्त अजीज शेख यांच्या खास मर्जीतला असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. विशेष म्हणजे त्याला तक्रारी आल्याचे कारण दाखवून दोन वेळा कामावरून कमीही करण्यात आले होते. तो सहा महिन्यांपूर्वी पुन्हा कामावर हजर झाला होता. यावरून त्यांच्यावर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची कृपादृष्टी असल्याची चर्चा सध्या महापालिका वर्तळात सुुरु आहे. त्यामुळे निलंबित केले गेले असले तरी चौकशीचा फार्स उरकून या सर्वांना क्लिन चीट देऊन पुन्हा कामावर घेण्याच्या हालचाली सुुरु असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे यातील बरेचसे अभियंते सत्ताधारी बहुजन विकास आघाडीतील बड्या नेत्यांशी जवळीक साधून आहेत. उपायुक्त अजीज शेख आणि सहाय्यक आयुक्त सदानंद सुर्वे यांच्या मदतीने या निलंबितांना पुन्हा कामावर घेण्याच्या हालचाली सुरु झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पार्टीत कोणताही बिल्डर नव्हता. तसेच खाजगी पार्टी असल्याने महापालिकेची प्रतिमा मलीन होण्याचा प्रश्न उद्भवत नाही, अशी भूमिका घेत अभियंत्यांनी महापालिकेतील काही अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा कामावर रुजू कसे होता येईल यासाठी मोर्चेबांधणी सुुरु केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अभियंत्यांना क्लिन चिट देऊन महापालिकेत पुन्हा घेतल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.