- पंकज राऊत बोईसर : तारापूर अणुऊर्जा केंद्र एक व दोन मधील नोकर भरतीच्या परीक्षेच्या प्रक्रियेवरून तारापूरचे प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांचा संतप्त जमाव रस्त्यावर उतरून व्यक्त केलेल्या संतापाची दखल घेऊन अखेर या भरतीला स्थगिती देण्याचे आश्वासन एनपीसीआयएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सतीश कुमार शर्मा यांनी खासदार राजेंद्र गवितांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत दिले.शर्मा यांच्या बरोबर मुंबई येथील अणुशक्ती नगरच्या दालनात नुकतीच खासदार राजेंद्र गवितांनी बैठक घेऊन तृतीय श्रेणीतील कामगार भरतीत स्थानिक प्रकल्प बाधित विद्यार्थ्यांना संधी देण्याची मागणी केली.या वेळी ह्यूमन रिसोर्स विभागाचे डायरेक्टर नागाची, भाजपाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र राऊळ, भाजपाचे पालघर तालुकाध्यक्ष प्रमोद आरेकर यांचेसह आंदोलक विद्यार्थी, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.शासनाच्या ८० टक्के भूमीपुत्राना नोकरीत संधी या धोरणानुसार ८० टक्के नोकºया ह्या विस्थापित झालेले आहेत त्यांनाच देऊन नोकर भरतीच्या परीक्षेमधील प्रश्नपत्रिकामध्ये वैकल्पिक भाषा म्हणून मराठी भाषेचा वापर करून सध्याची भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून नव्याने भरती प्रक्रिया राबवावी अशी खंबीर भूमिका खासदार गावित यांनी बैठकीत घेतली. या बैठकीत सर्व विषयावर सकारात्मक चर्चा होऊनसंबधित सर्व मागण्या केंद्र सरकार कडे पाठऊन त्याचा योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुख्य व्यवस्थापकीय संचालक शर्मा यांनी देऊन भरती प्रक्रियेला सध्यास्थगिती देऊन सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने गावितांच्या मध्यस्थीला चांगले यश आले आहे .>अखेर भूमिपुत्र व आंदोलकांना न्याय मिळालाअणुऊर्जा केंद्रातील कर्मचाºयांना घेऊन जाणाºया बस पाचमार्ग नाक्यावर अडवून त्याची तोडफोड करून सुमारे १० तास अणुकेंद्राचा रस्ता दि ४ रोजी रोखून धरला होता त्या वेळी खासदार राजेंद्र गावित व आमदार अमित घोडा यांच्या नेतृत्वाखाली तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या स्थानिक अधिकाºयांबरोबर वेगवेगळ्या बैठका होऊन तात्पुरता तोडगा काढल्या नंतर संतप्त आंदोलनकांनी संध्याकाळी आंदोलन मागे घेतले होते.दरम्यानच्या काळात खासदार गवितांनी प्रकल्पग्रस्त व आंदोलनकर्त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांवर नोकर भरती बाबत अणुऊर्जा प्रशासना कडून होणारा अन्याय थांबवून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी चर्चा केली त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी तारापूर प्रकल्प पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच केंद्रीय कामगार मंत्र्यांकडे बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.
तारापूर अणुकेंद्रातील नोकरभरतीला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 3:11 AM