विरार - विरारच्या अर्नाळा येथे टाईम बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. फेक्ट्रिपाडा येथील कचरा पेटीमध्ये 10 जिलेटिनच्या कांड्या आणि टायमर अशा साहित्यासह बॉम्ब असल्याची माहिती मिळत आहे.
शनिवारी (6 ऑक्टोबर) सकाळी 9.30 च्या सुमारास ग्रामपंचायतीतर्फे कचरा उचलण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना हा बॉम्ब सापडला. अर्नाळा पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर बॉम्ब शोधक पथकला याची माहिती देण्यात आली आहे.