जव्हार : गेल्या ८ ते १० वर्षापासून आदिवासी विकास प्रकल्पात वर्ग ३ व वर्ग ४ मध्ये रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाºयांना आदिवासी विकास प्रकल्पाकडून या वर्षाचे नियुक्ती आदेश न मिळाल्याने, रोजंदारी कर्मचाºयांवर टांगती तलवार आहे. तर गेल्या काही वर्षापासून रोजंदारीवर कामे करणाºया कर्मचाºयांना आदिवासी प्रकल्पाने कामाचे आदेश द्यावे, असे निवेदन प्रकल्प अधिकाºयांना त्यांनी दिले आहे. त्यांना या वर्षी कामाचे आदेश नसल्याने उपासमारीची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
जव्हार, मोखाडा विक्र मगड आणि वाडा असे तीन तालुके जव्हार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येत असून, या आदिवासी प्रकल्पात ३० शासकीय आश्रम शाळा आहेत. या आश्रम शाळांना रिक्त पदानुसार वर्ग3 आणि वर्ग ४ याप्रमाणे या आश्रम शाळांत जवळपास एकूण २०१ रोजंदारी कर्मचारी नियुक्त आहेत. त्या कर्मचाºयांनी गेल्या ८ ते १० वर्षापासून आश्रम शाळांवर रोजंदारी प्रमाणे दर दिवशी ६५ रु पये प्रमाणे कामे केली आहेत. मात्र आदिवासी विकास प्रकल्पाने या वर्षी रोजंदारी कर्मचाºयांना आदेश न दिल्याने ते अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे ते बेरोजगार झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जव्हार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी शनिवारी प्रकल्प अधिकाºयांना निवेदन देण्यासाठी आले होते. मात्र प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी उपस्थित नसल्याने या वर्ग ३ आणि वर्ग ४ कर्मचाºयांना आदेश मिळणार की नाही ? या विषयी उत्तर मिळाले नाही. म्हणून या कर्मचाºयांना साहाय्यक प्रकल्प अधिकाºयांकडे निवेदन दिले असून, येत्या मंगळवारी ते पुन्हा प्रकल्प अधिकाºयांकडे येणार असल्याचे या त्यांनी सांगितले. आम्ही एवढी वर्षे कमी मोबदल्यात कामे केली आहेत. त्यामुळे आम्हला या वर्षीचे रोजंदारीचे आदेश मिळावे अशी मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे. हे आदेश कधी मिळतील याबद्दल कोणतीही निश्चित माहिती कुणालाही नाही.जव्हार प्रकल्पातील कर्मचाºयांवरच अन्यायच्विशेष म्हणजे आदिवासी विकास अप्पर आयुक्त ठाणे अंतर्गत डहाणू आणि शहापूर या आदिवासी प्रकल्पातील रोजंदारीवर कामे करणाºया कर्मचाºयांना या वर्षीचे कामाचे आदेश दिले आहेत. मात्र जव्हार प्रकल्पातील रोजंदारी कर्मचाºयांना कामाचे आदेश का नाहीत? असा प्रश्न जव्हार प्रकल्पात रोजंदारीवर कामे करणाºया कर्मचाºयांनी विचारला आहे. तसेच शहापूर, आणि डहाणू या आदिवासी विकास प्रकल्पात रोजंदारीवर कामे करणाºया कर्मचाºयांना अप्पर आयुक्त ठाणे यांच्याकडून आदेश मिळालेत, मात्र जव्हार आदिवासी विकास प्रकल्पात रोजंदारीवर कामे करणाºया कर्मचाºयांना या वर्षीचे कामाचे आदेश का नाही? असा प्रश्न त्यांना पडला आहे.च्आदिवासी प्रकल्पातील आदेश न मिळालेल्या रोजंदारी कर्मचाºयांनी माकपाचे राज्य कमिटी सदस्य कॉ. रतन बुधर यांच्या नेतृवाखाली निवेदन दिले आहे. त्याच बरोबर निवेदन देतांना, कॉ. यशवंत घाटाळ कॉ. शिवराम बुधर, तसेच वर्ग 3 आणि वर्ग ४ कर्मचारी वर्ग उपस्थित होते. तसेच तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल , असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.