जव्हार : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे गणिताचे प्रशिक्षण पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे न घेता हे प्रशिक्षण शिक्षकांच्या सोयीनुसार जव्हार येथे घेण्यात यावे अशी मागणी स्वाभिमान शिक्षक संघटनकडून जव्हारचे गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे क रण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्र मगड, व वाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना गणिताच्या प्रशिक्षणासाठी बोईसर येथे बोलाविण्यात येते. मात्र, या प्रकारामुळे त्यांचा वेळ व पैसा वाया जात असून त्रास सुद्धा होत आहे. असे उलट सुलट आदेश न देता, प्रशिक्षण देणाऱ्या तज्ञांनेच जव्हार मध्ये येवून मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करुन घेतल्यास शेकडो शिक्षकांची धावपळ वाचेल असा युक्तीवाद स्वाभिमान शिक्षक संघटनेकडून करण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमान शिक्षक संघटना जव्हार तालुका अध्यक्ष महेंद्र सहारे व शिक्षक वर्ग उपस्थित होते.जव्हार, मोखाडा ही पालघर जिल्ह्यातील अतीदुर्गम भागातील तालुके आहेत. या तालुक्यातील शिक्षकांना गणिताच्या प्रशिक्षणस्थळी पोहण्यासाठी अक्षरश: कसरत करावी लागते. तसेच, हे प्रशिक्षण निवासी नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यापूर्वी बोईसारला मोटार सायकलवर प्रशिक्षणासाठी जातांना मुंबई अहमदाबाद मार्गावर अपघात घडल्याचा घटना घडल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना बोईसर हे ठिकाण प्रशिक्षणासाठी शिक्षकांना गैरसोयीचे बनले आहे. (वार्ताहर)
शिक्षकांसाठीचे गणित प्रशिक्षण जव्हारमध्येच घ्या
By admin | Published: January 25, 2017 4:34 AM