वसई : तलाठी कार्यालयातील अनागोंदी कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी वसईच्या तहसिलदारांनी कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. यापुढे दर सोमवारी व गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत तलाठी कार्यालयात हजर रहावे. खाजगी सहाय्यकांना कार्यालयात येऊ देऊ नये अन्यथा फौजदारी गुुन्हे दाखल करू असा इशारा तहसिलदार किरण सुरवसे यांनी दिला आहे.जनआंदोलन समितीने वसईतील विविध प्रश्नासंंबंधी सुरवसे यांची भेट घेतली. त्यात तलाठी कार्यालयातील अनागोंदी कारभाराच्या तक्रारी केल्या. तलाठी कार्यालयात नसतात. खाजगी सहाय्यक कारभार करीत असून सरकारी दस्तऐवज गहाळ करणे, त्यात हवे ते बदल करणे असे प्रकार सुरु आहेत. तलाठी फेरफार नोंदी करण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारी करण्यात आल्या. यावेळी तलाठ्यांना कार्यालयात हजर राहण्यासोबतच खाजगी सहाय्यक काढून टाकण्याचे निर्देश दिले. तसेच फेरफार नोंदी ताबडतोब कराव्यात असेही त्यांनी तलाठ्यांना निर्देश दिले.तिवरांची कत्तल होऊ नये यासाठी दक्षता घेऊ, पाणथळ जागेवरील भरावाचे पंचनामे जनआंदोलन समितीच्या पदाधिकाºयांसमोर केले जातील. रेशन दुकानांवर पुरेशा साठा ठेवला जाईल. रेशन विभागात भ्रष्टाचार आढळल्यास त्वरीत कारवाई केली जाईल. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे पुढील आठवड्यात पूर्ण करु असे आश्वासन तहसिलदार सुरवसे यांनी दिले.वठणीवर आणणारतलाठ्यांच्या कार्यपद्धती सुधारण्यासाठी एक महिन्यांचा अवधी दिला असून सुधारणा झाली नाही तर जनआंदोलनाचे कार्यकर्ते आपल्या स्टाईलने तलाठ्यांना वठणीवर आणण्याचे काम करतील, असा इशारा दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी दिली.डॉमणिका डाबरे, सुनील डिसिल्वा, शाम पाटकर, बवतीस फिगेर, जॉर्ज फरगोस, प्रफुल्ल ठाकूर, मयंक शेट आदी प्रमुख कार्यकर्त्यांंसह अनेक जण हजर होते. या वेळी सर्वांचा आक्रमक पवित्रा होता.
तलाठ्यांच्या मनमानीला चाप, तहसीलदारांनी वेसण ताणली, खाजगी सहायकांना मनाई, फौजदारी कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 3:43 AM