तलासरी : केंद्र व राज्य सरकार एकीकडे डिजिटल इंडियाचा नारा देत सर्व कामकाज आॅनलाइन करण्यांचे स्पष्ट धोरण असतांना ही सेवा देणारी येथील दुरुध्वनी केंद्र ती देतांना असमर्थ ठरत असल्याने सर्वत्र टिका होते आहे. वारंवार ती कोलमडत असून त्या बाबत केलेल्या तक्रारीला सुद्धा कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याने ‘हेच का अच्छे दिन’ असा सवाल विचारला जात आहे.तालुका तसा ग्रामिण व आदिवासी लोकसंख्या असलेला असल्याने येथे फारसे व्यवहार आॅनलाईन नाहीत. मात्र, गत काळात शासनाने ज्या निर्णय प्रक्रीया राबविल्या त्यामुळे सर्वच जनतेला आॅनलाईन प्रक्रीयेशी स्वत:ला जोडावे लागले आहे. मात्र, दररोज येथे इंटरनेटची सेवा डाऊन राहत असल्याने विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक सर्वांनाच त्याचा त्रास होत आहे.मुळात अधिकारीवर्ग हा पाट्या टाकणारा असल्याने ग्राहकांच्या तक्रारींकडे पहायला कुणालही वेळ नाही अशी स्थिती आहे. या प्रकारामुळे दुरध्वनी केंद्राच्या ग्राहक संख्येवरही त्याचा परीणाम झाला आहे. येथे एकही जबाबदार अधिकारी नसल्याने केंद्र वारंवार बंद पडते त्यामुळे शासकीय कामकाज तसेच बँकांचे व्यवहार थांबत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होतात.सद्या तलासरी दूरध्वनी केंद्राला एकही जबाबदार अधिकारी नाही पण या केंद्राला दिलेला अधिकारी हरीनारायण जयस्वाल हे महिना महिनाभर केंद्राकडे फिरकत नाही त्यामुळे केंद्र सुरक्षा रक्षक, लाईन मन याच्या भरवशावर चालले आहे
तलासरी दूरध्वनी सेवा रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:19 AM