शशी करपे , वसईयेथील टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्याचे दाखवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याची धक्कादायक व गंभीर बाब पंचायत समितीच्या लेखापरीक्षण अहवालावरून उघडकीस आली आहे. या प्रकरणाची गंभीरतेने दाखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकरणी जे अधिकारी जबाबदार होते त्या अधिकाऱ्यांना गुणवंत अधिकारी म्हणून गौरवण्यात येते यापेक्षा दुर्दैवी बाब असू शकत नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. प्रत्येक वर्षी टंचाईग्रस्त परिस्थितीत वसई तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी गाव, पाड्यावरील जनता पाण्यासाठी वणवण करीत असते. विशेषत: आदिवासी महिला तासनतास पाण्यासाठी पायपीट करत असतात. अशा वेळी टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र अशा गावांना पाणीपुरवठा केला नसतानाही तो केल्याचे दाखवून लाखो रुपये लाटल्याची बाब लेखापरीक्षणावरून समोर आली आहे.
पंचायत समितीत झाला टँकर घोटाळा
By admin | Published: September 13, 2016 2:02 AM