बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीतील नोव्हा फाईन स्पेशालिटीज या कंपनीतील रिअॅक्टरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्य होऊन परिसरातील पाच कंपन्यांनाही प्रचंड नुकसान झाले असून या अग्निकांडाची सखोल चौकशी करून दोषींवर तत्परतेने कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री विष्णू सवरा यांनी दिलेत.त्यांनी शुक्रवारी रात्री तारापूर औद्योगिक वसाहतीतील दुर्घटना स्थळाची पाहणी करून नंतर रुग्णालयातील जखमींच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी आमदार पास्कल धनारे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक योगेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी विकास गजरे, तहसिलदार महेश सागर, यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळी भेट देण्यापूर्वी पालकमंत्री सवरा यांनी टिमा सभागृहात सर्व अधिकाºयांची बैठक घेऊन अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी कायमस्वरूपी व प्रभावी यंत्रणा असावी असेही सांगितले त्यापूर्वी माजी राज्य मंत्री राजेन्द्र गावित यांनीही दुर्घटना स्थळाला भेट दिली.बीएआरसीच्या अधिका-याविरुद्ध गुन्हा दाखलपंकज राऊतबोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीत मधील नोव्हा फाईन स्पेशालिटीज या कंपनीस गुरुवारी रात्री लागलेली भीषण आग विझविण्यासाठी तारापूर येथील भाभा आॅटोमिक रिसर्च सेंटरची (बीएआरसी) अग्निशमन गाडी (फायर टेंडर) त्वरीत उपलब्ध करून न देणाºया बीएआरसीच्या संबधितअधिका-यां विरोधात बोईसर पोलीस स्थानकात शुक्र वारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.जिल्हाधिकाºयांच्या सूचनेनुसार बीएआरसी च्या अधिकाºयांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तसेच बोईसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी दूरध्वनीद्वारे अग्निशमन दलाची गाडी पाठविण्यास सांगितले मात्र त्यांनी असे सांगितले की, मला वरिष्ठांना विचारावे लागेल त्यांच्या अनुमतीशिवाय मला काहीही करणे शक्य नाही. अशा प्रकारे प्रसंगाचे गांभिर्य लक्षात न घेता दुरुत्तरे दिल्याने पालघरचे जिल्हाधिकारी नारनवरे यांच्या आदेशा नंतर उपविभागीय दंडाधिकारी विकास गजरे यांनी गुन्हा दाखल केला.स्फोटानंतर लागलेल्या प्रचंड आगीमुळे परिसरात असलेल्या आरती ड्रग्ज, प्राची केमिकल्स, भारत रसायन, युनिमॅक्स यांना देखील आग लागलेली होती.या आगीची भीषणता पाहून ती आटोक्यात आणण्याकरीता वसई विरार महानगरपालिका, एम.आय.डी. सी., रिलायन्स इंडस्ट्रीज डहाणू यांच्या आगीच्या बंबांनी झुंज दिली तरी आग नियंत्रणात येत नव्हती त्यामुळे बीएआरसीकडे बंबाची मागणी केली होती. त्याचा अपवाद वगळता इतर सगळ्यांनी ती तत्परतेने पूर्ण केली होती.आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असतात. अशा घटने दरम्यान या कायद्यानुसार जिल्हाधिकाºयांना विशेष अधिकार प्राप्त होतात. परंतु या घटनेनंतर बीएआरसीच्या संबंधित अधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशाचे पालन केलेले नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५६ व ५७ चा भंग केल्याने त्यांच्याविरु द्ध या कलमान्वये फिर्याद दाखल केली आहे तर अशा प्रकारचा जिल्ह्यात पहिलाच गुन्हा दाखल झाल्याने यासंदर्भात आता काय कारवाई होते त्या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कारवाई संदर्भात बीएआरसीचे प्रशासन कोणती भूमिका घेते याकडेही लक्ष लागले आहे.
तारापूर अग्निकांडाची चौकशी, पालकमंत्री विष्णू सवरा यांनी दिले आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 6:21 AM