शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

तारापूर,पामगावात मॉकड्रिल

By admin | Published: December 17, 2015 12:26 AM

तारापूर अणुऊर्जा केंद्र एक व दोनमध्ये भूकंपामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून किरणोत्सर्ग बाहेर पडल्याचे गृहीत धरून केंद्र परिसर व पाम गावामध्ये आज आॅफ साईट इमर्जन्सी

बोईसर : तारापूर अणुऊर्जा केंद्र एक व दोनमध्ये भूकंपामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून किरणोत्सर्ग बाहेर पडल्याचे गृहीत धरून केंद्र परिसर व पाम गावामध्ये आज आॅफ साईट इमर्जन्सी एक्झरसाईजची रंगीत तालीम घेण्यात आली तर याबाबत अनभिज्ञ असलेल्या ग्रामस्थांमध्ये काही काळाकरिता घबराट पसरली तरी या तालमी बाबतची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना देण्यात आल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.अशी कल्पना करण्यात आली की विरारच्या पुढे केंद्रबिंदू असलेला तीव्र क्षमतेचा भूकंप येथे झाला असून त्यामुळे महाराष्ट्रातील विद्युत व दळण-वळण यंत्रणा विस्कळीत झाल्या आहेत. त्यामुळे तारपूर रिअ‍ॅक्टर्स बंद पडले आहेत. अशा स्थितीत इमर्जन्सी डिझेल जनरेटर्स आपोआप सुरू होतात. ज्या द्वारे रिअ‍ॅक्टर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक तो विद्युतपुरवठा केला जातो. तद्नंतर डिझेल जनरेटर्स वेगवेगळ्या कारणास्तव बंद पडून अणुभट्टीला जोडणाऱ्या पाइपलाइन भूकंपामुळे फेल्युअर झाल्याने रिअ‍ॅक्टरमधील कुलींग यंत्रणा ठप्प होऊन इंधन थंड करण्याची प्रक्रिया थांबल्याचे गृहीत धरण्यात आले.या काल्पनीक घटनेमुळे किरणोत्सर्ग बाहेर पडून प्रथम अणुकेंद्रात पसरून तो वाऱ्याच्या दिशेने झपाट्याने पसरून पाम गावापर्यत पोहचत असल्याचे गृहीत धरून सकाळी साडेसात वाजता आपत्कालीन परिस्थितीची घोषणा तारापूरच्या डीएई सेंटर कडून करण्यात आली. त्यानंतर जिल्हाप्रशासन, पोलीस, जिल्हापरिषद, आरोग्य विभाग, वाहतूक व्यवस्थापन, परीवहन महामंडळ, महसूल,नागरी संरक्षण दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती कार्यरत होऊन बाधीत पाम गावात दाखल होऊन आॅफ साईट इमर्जन्सी एक्झरसाईजची रंगीत तालीम सुरू झाली.वेगवेगळ्या टीम बाधीत पाम गावात दाखल झाल्यानंतर नागरीकांना नाकातोंडावर रूमाल बांधण्याची सूचना देऊन घराच्या दरवाजे खिडक्या बंद करून घरातच बसण्याची विनंती करण्यात आली. बाधीत सेक्टर वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊन रेडियोधर्मी आयोडीनपासून थायरॉईडला धोका पोहचू नये म्हणून आयोडीनच्या गोळ्याच्या रूपात चॉकलेटचे वाटप करण्यात आले.एक्सरसाईजच्या तिसऱ्या टप्प्यात गावातील ४६ पुरूष व २१ महिला अशा ६७ नागरीकांना किरणोत्सर्गाची किती बाधा झाली आहे ते तपासून दोन एस.टी च्या बसेस मधून सोळा कि. मी. त्रिज्येच्या बाहेर जि.प. शाळा चारोटी येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले तर बाधीत गावातून आलेल्या एस.टी बसही डीकंडामेशन करण्यात आली. ही प्रक्रिया दुपारी साडेबारा वाजता यशस्वीपणे झाल्याचे जाहीर करण्यात आली.अनेक ग्रामस्थांना हा प्रकार नवा असल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तारापूरचा हा भाग राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असल्याने या ठिंकाणी सुरक्षेचा उपाय म्हणून अशी मॉकड्रिल घेण्यात येते.