बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील औद्योगिक क्षेत्रातील काही कारखान्यांमधून प्रचंड प्रमाणात हवेत सोडण्यात येणाऱ्या दुर्गंधीयुक्त वायू त्विरत रोखण्यात यावा या मुख्य मागणी करीता शिवशक्ती या सामाजिक संघटनेने लोकमत वृत्ताची दखल घेऊन तारापूरच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यलयावर शुक्र वारी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे
या मोर्चा संदर्भातील रूपरेषा व माहिती देण्यासाठी मंगळवारी बोईसर येथील सिल्व्हर एव्हेन्यू या हॉटेल मध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी शिवशक्ती या सामाजिक संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष संजय ज.पाटील, कुणबी सेनेचे राज्य प्रतिनिधी रमेश डोंगरे, पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डेरल डिमेलो, शिवशक्ती चे कार्यकर्ते गजानन देशमुख उपस्थित होते. मागील काही महिन्यापासून दिवसा व रात्री कधीही अनिधकृतपणे हवेमध्ये दुर्गंधीयुक्त वायू सोडण्यात येत असल्याने हा दुर्गंधीयुक्त वायू एमआयडीसी सह परिसरातील सर्व गावांतील नागरीवस्त्यांमध्ये पसरतो तेव्हा श्वसनाला प्रचंड त्रास होऊन काही काळ गुदमरल्यासारखे होऊन मळमळते व जीव कासावीस होतो याचा प्रत्यक्ष त्रास एमआयडीसी मध्ये काम करणाºया हजारो कामगारांबरोबरच बोईसरसह परिसरातील गावातील नागरिकांना सहन करावा लागत असल्याने हा गंभीर प्रश्न आम्ही हाती घेतला असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले
याच बरोबर वाढत असलेले जीवघेणे प्रदूषण व त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी म.प्र. नि. मंडळाला येत असलेले अपयश, प्रदूषणामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न , भूगर्भातील झालेले प्रदूषित पाणी, नापीक झालेल्या शेतजमिनी, रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रि या न करताच ते समुद्रात सोडत असल्याने खाडी किनाºयावरील पारंपरिक मासेमारी संपुष्टात येऊन त्या मच्छीमारांवर उपासमारीचे आलेले संकट, झिरो डिस्चार्ज, जुनी सांडपाणी पाईपलाईन बंद करणे, २४ तास हवा प्रदूषण मोजमाप यंत्रणा तात्काळ सुरू करणे , घातक घनकचरा वेस्ट मॅनेजमेंट कडे पाठविणे , एमआयडीसीमध्ये ठीक ठिकाणी सीसीटीव्ही बसवून, स्ट्रीट लाईट सुरु करणे इत्यादी विषयावर पत्रकार परिषदेत चर्चा करण्यात येऊन सर्व प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारांनी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकानी केले