शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

टीडीसी बँकेतील रिक्तपदांच्या अर्जावर लावला जबर जीएसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 3:56 AM

‘एक देश एक कर’ अशी भूमिका घेऊन केंद्र शासनाने व राज्य शासनाने अनेक वस्तू व सेवांवर लादलेल्या जीएसटीचा फटका नोकरी इच्छिणाºया बेरोजगारांना बसला आहे.

विक्रमगड : ‘एक देश एक कर’ अशी भूमिका घेऊन केंद्र शासनाने व राज्य शासनाने अनेक वस्तू व सेवांवर लादलेल्या जीएसटीचा फटका नोकरी इच्छिणाºया बेरोजगारांना बसला आहे. त्यामुळे भरतीसाठी घेण्यात येणाºया परीक्षेच्या शुल्कामध्येही जीएसटी पहिल्यांदाच समाविष्ट झाल्याने त्यात मोठी वाढ झाली आहे. परिक्षेसाठी अर्ज करणाº्या अनेक परीक्षा देणाºया बेरोजगार गरीब आणि गरजू उमेदवारांना त्याचा फटका बसला आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध पदाच्या २०५ जागांची जाहिरात विविध वृत्तपत्रांत व जिल्हा बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे त्या नुसार विविधपदासाठी पदानुसार फी आकारण्यात आली असून तीवर पदानुसार ११८ रुपया पासून ते ७२ रुपयापर्यंत जीएसटी आकारण्यात आला आहे. हा कर स्पर्धा परीक्षांनाही शासन लागू करणार का..? केल्यास त्याचा फटका स्पर्धा परीक्षा देणाºया अनेक गरीब बेरोजगार तरुणांना बसणार? त्याचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासन जीएसटीच्या नावे नाहक त्यांची लूट करणार असून त्यामुळे स्पर्धा परिक्षांची तयारी करणाºया तरुणांना मोठा शॉक बसला आहे. तसेच त्यांच्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.ज्युनियर बँकिंग असिस्टंट ङ्क्त १६०पदे. परीक्षा फी ५५० आणि जीएसटी १०० रु पये अशी एकूण ६५० रु पये फी, सिनियर बँकिंग असिस्टंट ङ्क्त १९ पदे.परीक्षा फी ६०० आणि जीएसटीङ्क्त१०८ रु पये असे एकूण ७०८ रु पये फी, शिपाई ङ्क्त २० पदे, परीक्षा फी ४०० आणि जीएसटीङ्क्त ७२ रु पये असे एकूण ४७२ रु पये फी, वॉचमन ङ्क्त ३ पदांसाठी परीक्षा फी ४०० आणि जीएसटीङ्क्त ७२ रु पये असे एकूण ४७२ रु पये फी, अधिकारी जे एम ङ्क्त ३ पदे. परीक्षा फी ६५० आणि जीएसटीङ्क्त११८ रु पये असे एकूण ७६८ रु पये फी, आकारण्यात आली आहे. प्रामुख्याने राज्यात होणाºया विविध नोकर भरतीच्या परीक्षेसाठी प्रामुख्याने मागासवर्गीयांसाठी २०० ते ३०० व खुल्या वर्गासाठी ३०० ते ४०० रु पया पर्यंत फी आकारली जाते या बाबत गेल्या वर्षी शासन निर्णय ही झाला आहे परंतु ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीच्या फी मध्ये जीएसटी आकारल्याने याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक बसणार आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात फी आणि त्यावर आकरण्यात येणाºया जीएसटीमुळे अनेक गरीब विद्यर्ा्थ्यांना इच्छा असूनही त्यांना या नोकरभरतीच्या परिक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे त्यामुळे या नोकरभरतीचा फॉर्म भरून आपले नशीब आजमावणाºया ग्रामीण भागातील गरीब बेरोजगार सुशिक्षित तरु णांनी नाराजी व्यक्त केली आहे.तसेच पुढील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली असून या नोकरभरतीच्या फीवर आकारण्यात येणाºया जीएसटी विरोधात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची काही विद्यार्थ्यांनी तयारी सुरु केली आहे. रोजगार, नोकºया मिळवून देणे दूरच राहिले त्यासाठी अर्ज करणेही परवडू नये अशा रितीने सरकारी कारभार सुरू आहे अशी टीका काही विद्यार्थी संघटंनांनी लोकमतशी बोलतांना केली आहे.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँँकेच्या भरतीतील परीक्षेच्या फी वर जीएसटीकर आकारण्यात आला आहे ही दुर्दैवी बाब आहे. ही बँक शेतकºयांची आहे. या बँकेच्या नोकरभरतीत शेतकºयांची मुले अर्ज करणार आहेत. या वर्षी शेतकºयांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असतांना जीएसटी लावलेली ही अवास्तव फी भरतांना शेतकºयांच्या मुलांच्या नाकी नऊ नक्कीच येणारआहेत.-अमोल सांबरे, परीक्षार्थीस्पर्धा परिक्षेच्या फी वर शासन जीएसटीसारखे कर आकारु न पैसे जमा करणार असेल तर ती मोठी खेदाची बाब ठरेल. अनेक इच्छुकांना कोणतेही उत्पन्न मिळविण्याचे साधन नाही. अशा स्थितीत ते एवढी फी कुठून भरणार? चार- पाच वर्षांपासून ते अभ्यास करीत आहेत. त्यांच्या स्वप्नांवर या फीमुळे पाणी पडणार आहे. या २०५ पदासाठी अंदाजे २० ते २५ हजार अर्ज येण्याची शक्यता आहे. या मध्ये मोठया प्रमाणात फी रुपात पैसे जमा होणार आहेत. या नोकर भरतीच्या प्रक्रियेसाठी इतका नक्की खर्च येईल का हा देखील संशोधनाचा विषय ठरेल.-सचिन विलास भोईर, अध्यक्ष, युवा स्पर्शआम्ही परीक्षा घेण्यासंदर्भात मागवलेल्या निवेदितेत एकदम कमी रेट असलेल्या कंपनीला परीक्षा घेण्याचा ठेका दिला आहे. हा जीएसटीचा भार त्या कंपनीने त्यांच्या परीने लावला आहे. - राजन पाटील, चेअरमन, टि.डी.सी.बँक

टॅग्स :GSTजीएसटी