विक्रमगड : जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन गेल्या महिनाभरापासून लांबणीवर पडला असल्याने शिक्षकांचे फॅमिली बजेट पुरते कोलमडुन गेले आहे़ प्रशासकीय यंत्रणा कामे वेळेत कामे करीत नसल्यानेच वेळेत पगार होत नाही असा आरोप केला जात आहे़ मागील महिन्याचा पगार दुसरा महिना संपत आला तरी होत नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे़ वारंवार तक्रारी करुनही जिल्हा शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारची उपाय योजना करण्यांत आलेली नाही. त्यामुळे मार्चचा पगार एप्रिलच्या ५ तारखेला नियमानुसार होणे आवश्यक असतांनाही एप्रिलची २६ तारीख उजाडली तरी तो झालेला नाही. त्यामुळे आम्ही जगावे तरी कसे? असा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे मासिक वेतन गेल्या सहा महिन्यांपासून नियमित होत नसल्याने जि़ प़ शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागत आहे़ गेल्या सहा महिन्यांपासून ही परिस्थती असल्याने शिक्षकांचे कौटुंबिक अर्थकारण कोलमडून गेले आहे़ त्यांना वेळेत पगार मिळत नसल्याने उसनवारी करुन घरखर्च भागवावा लागत आहे. एकीकडे पगार नाही आणि दुसरीकडे दहावी बारावीच्या परिक्षांची कामे खिशातून खर्च करून पार पाडावी लागत असल्याने हे शिक्षक मेटाकुटीला आले आहेत. याबाबत वेळोवेळी अधिका-यांना भेटूनही काहीही उपयोग होत झालेला नाही याला तर यास जिल्हा शिक्षण विभागाचा हालगर्जीपण कारणीभूत असल्याचा आरोपही होत आहे़मार्चच्या वेतन देयकावर जिल्हा वित्तअधिकारी पतंगे यांनी हरकत घेतली असून हे वेतन देयक अदा करण्यासाठी शिक्षण संचालक पुणे यांच्या सहीचे मुळ अधिकारपत्रच प्राप्त न झाल्याने जि़ प़ शिक्षकांचे पगार रखडले आहेत. संचालकांचे हे पत्र दर तीन महिन्यांनी आवश्यक असते ते मिळविण्याची जबाबदारी ही जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिका-यांची आहे़ त्यांच्या या दुर्लक्षामुळे ही वेळ शिक्षकांवर आली असल्याचे बोलले जात असून त्यामुळेच जि़ प़ शिक्षकांचे पगार अदयापही होऊ शकलेले नाही़ ते कधी होतील याची माहिती कुणीही देऊ शकत नाही.हे विशेष. (वार्ताहर)
शिक्षकांचे पगार रखडले
By admin | Published: April 27, 2017 11:46 PM