हुसेन मेमनजव्हार : तालुक्यात २५० जिल्हा परिषद शाळा असून, बºयाच शाळांमध्ये विद्यार्थी संख्या समाधानकारक आहे. परंतु त्या शाळेवर विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच उरलेले नाहीत. जव्हार तालुक्यातील आदिवासी भागातील अनेक शाळा त्यामुळे बंद केल्या जात आहेत.अधिकाºयांच्या मनमानी कारभारामुळे या भागातील जिल्हा परिषद शाळांवर मोठी संक्रांत आली आहे. पहिली ते ७ वी पर्यंतच्या अनेक शाळांमध्ये फक्त एक अथवा दोनच शिक्षक आहेत. ज्याठिकाणी कमी पट आहे. तेथील शिक्षकांचे शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला समायोजन करण्यात आलेले होते. त्यामुळे शिक्षणाचा गाडा बºयापैकी हाकला जात होता. डिसेंबर महिना हा स्पर्धा आणि स्पोकन इंग्रजी प्रशिक्षण, पायाभूत प्रशिक्षण, शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण यात गेला.पुरेसे शिक्षक शाळेवर नसल्याने,मुलांची शालेय प्रगती थांबणार आहे. कार्यालयाकडून रोजच वेगवेगळे फतवे काढून वेगवेगळी माहिती मागविली जात आहे.अनेक शिक्षक निवडणुकीच्या आॅनलाइन कामांमध्ये गुंतलेले आहेत.शाळांची विविध प्रकारची आॅनलाइन कामे करावीत की कार्यालयाला लागणाºया कागदपत्रांची पूर्तता करावी की प्रशिक्षणे पूर्ण करावीत, हे करीत बसलो तर विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे आणि कधी? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.जव्हार जि. प. शाळांतील प्रतिनियुक्त्यांचे पद्धतशीररित्या नियोजन करायचे होते. तर त्यांनी शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच तसे प्रस्ताव पाठवायला पाहिजे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवता आले असते. परंतु त्यांनी योग्य वेळी निर्णय न घेता,आता ऐन शैक्षणिक हंगामात आणि परीक्षा तोंडावर आल्या असताना, प्रतिनियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावहारिकदृष्ट्या हे अतिशय चुकीचे पाऊल आहे.
शिक्षक हरकामे, शिकवायचे कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:11 AM