पालघर : पुढील वर्षात येवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीची पुर्वतयारी सुरु झाली असून त्याचाच एक भाग म्हणून गुरूवारी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्सची प्राथमिक स्तराची तांत्रिक तपासणी करून सुर्या कॉलनी, पालघर येथील गोदाममध्ये मॉक पॉल प्रक्रि या पार पडली.जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे तसेच उपजिल्हाधिकारी निवडणूक डॉ. किरण महाजन यांनी उपस्थितांना यावेळी संबंधित मशीन्सची माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, आमदार अमित घोडा, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.निवडणूक ही लोकशाही प्रक्रि येतील महत्वपूर्ण बाब असून सर्वांच्या सहभागाने ती यशस्वी होणे गरजेचे आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन आपल्या बाजुने पूर्ण तयारी करीत असून विशेष मोहिमेनंतर सध्या मतदार याद्यांची शुद्धीकरण प्रक्रि या सुरू आहे. यामध्ये काही सूचना असतील तर त्या कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी लोकप्रतिनिधींना केले. मतदारांची प्रारूप यादी १ सप्टेंबर रोजी प्रकाशित करण्यात आली होती, त्यात सुधारणा करून ४ जानेवारी रोजी अंतिम यादी प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. महाजन यांनी दिली.लोकसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणाºया बीईएल बेंगलोर कंपनीकडील २ हजार ६८४ कंट्रोल युनिटसह ४ हजार ६१५ बॅलेट युनिट तसेच २ हजार ६८४ व्हीव्हीपॅट नवीन मशीन्स उपलब्ध झाल्या आहेत. या मशीन्सच्या प्राथमिक लेव्हलची तांत्रिक तपासणी सध्या सुरू आहे. या मशीन्सद्वारे मतदाराला त्याने ज्या उमेदवारास मतदान केले त्याची पावती त्याच ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीनमध्ये पाहता येईल.पाहा मतदानाची पावतीया मशीन्सद्वारे मतदाराला त्याने ज्या उमेदवारास मतदान केले त्याची पावती त्याच ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीनमध्ये पाहता येईल.मतदान केल्यानंतर १५ सेकंदपर्यंत ती पावती मतदारास दिसेल. त्यानंतर ती मशीनच्या बॉक्समध्ये सुरक्षित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची तांत्रिक तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 4:03 AM