लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई पाचूबंदर येथे ९ कोटी ३० लाख रुपये खर्चाची जेटी बांधण्यात येणार असून त्यासाठी नव्याने निविदा मागवण्यात आल्या आहेत.नाबार्ड आणि राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत ९ कोटी ३० लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्या दहा कामांसाठी जाहीर ई-निविदा ठेकेदारांकडून मागविण्यात आल्या होत्या. परंतु सागरी कामांचा योग्य अनुभव नसलेल्या काही ठेकेदारांकडून निविदेतील अटी व शर्ती शिथील करण्याबाबत मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याकडे हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. त्यानंतर जानकर यांनी निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली होती.वसईतील पाचूबंदर किनारा हॉटेलजवळ नवीन जेटी, त्याला संलग्न बोट यार्ड आणि नवीन विकासकामे याचा त्यात समावेश आहे.मात्र, संबंधित अधिकाºयांनी त्या प्रस्तावाला बगल देऊन एका बाजूला दळणवळणाची सोय नसलेल्या ठिकाणी जेटी बांधण्याचा घाट घातला होता. मात्र, आमदार हितेंद्र ठाकूर पाचूबंदर येथेच जेटी व्हावी यासाठी आग्रह धरला होता.तसेच वसई सागरी कोळी मच्छिमार सहकारी संस्था, वसई मच्छिमार सर्वोदय सहकारी संस्था यांनी पाचूबंदर जेटीसाठी पाठपुरावा ठेवला होता. त्यानुसार आता मच्छिमारांना अभिप्रेत असणाºया चार जेट्या बांधण्यात येणार आहेत.मच्छीमारांनी सोडला सुटकेचा नि:श्वासमच्छीमारांनी या निर्णयामुळे सुटकेचा निश्वास सोडला असून आता हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास जावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पाचूबंदर जेटीसाठी ९ कोटींची निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 6:17 AM