शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

वनगांच्या धमकीला ठाकुरांनी दिले आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 11:35 PM

भाजपाच्या नादाला लागाल तर मरे पर्यंत तुरुंगात ठेऊ या खासदार चिंतामण वनगा यांच्या धमकीला रविवारी चोख उत्तर देत

डहाणू : भाजपाच्या नादाला लागाल तर मरे पर्यंत तुरुंगात ठेऊ या खासदार चिंतामण वनगा यांच्या धमकीला रविवारी चोख उत्तर देत राष्टÑवादी कॉँग्रेसचे आमदार आनंद ठाकूर यांनी ‘राज्यात असलेल्या सत्तेच्या जोरावर इतर पक्षांच्या उमेदवारांवर दबाव टाकू नका, निवडणूक जिंकु न तुम्हाला प्रत्यूत्तर देऊ’ असे चोख उत्तर देऊन येथे होत असलेल्या नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराचे उद्घाटन केले.डहाणू नगरपरिषदेच्या १३ डिसेंबर रोजी होत असलेल्या निवडणूकीच्या प्रचारामध्ये या कलगितुºयांने चांगलीच रंगत वाढली आहे. शनिवारी येथील सत्ताधारी राहीलेल्या राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. त्यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिहीर शहा तसेच तालुकाध्यक्ष राजेश पारेख यांच्या सह नगरसेवकपदाच्या निवडणूकीसाठी उभे असलेले सर्व उमेदवार तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेसने डहाणू शहरात केलेल्या विकासकामांच्या जोरावर राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत बसेल असा विश्वास आमदार ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांनी भाजपच्या वाकड्यात गेला तर मरेपर्यंत तुरु ंगात ठेवू अशी धमकी दिली होती. या वल्गनेला प्रत्यूत्तर दिले. यावेळी उपस्थित असणाºया कार्यकर्त्यांना भाजपाला चोख प्रत्यूत्तर देण्यासाठी कामाला लागा असे मार्गदर्शन ठाकूर यांनी केले. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने डहाणू शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची रॅली काढली होती. यावेळी उमेदवारांनी जनतेशी संपर्क साधला असून ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिहीर शहा यांच्या निवास्थानापासून सुरु झालेली ही रॅली सर्व प्रभागातुन फिरवण्यात आली होती. डहाणू मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, बविआ, काँग्रेस माकप या सर्वच पक्षांनी प्रचारावर जोर दिला असुन चौका चौकातील प्रचारावर जोर दिला जात आहे.वाड्यातील भाजपाचा प्रवास आव्हानात्मकवाडा : नगर पंचायतीच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षासह १७ प्रभागात उमेदवार उभे करून सत्तेचा प्रबळ दावेदार असलेल्या शिवसेनेसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मागील निवडणूकीची पार्श्वभूमी पहाता भाजपाला खुप कष्ट करावे लागणार आहेत एवढं नक्की. मागील १५ वर्षात तीन ग्रामपंचायत निवडणूका भाजपाने शिवसेने सोबत युती करून लढवल्या आहेत. यामध्ये वाट्याला आलेल्या जागांवर भाजपाला पुरेसे उमेदवार मिळाले नव्हते.मात्र, आता परिस्थिती बदलली असून राज्यात सत्ता तसेच पालकमंत्री पद असल्याने भाजपा कार्यकर्तेही त्वेशाने काम करीत असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत काळापासून असलेली डंपिंग ग्राऊंडची समस्या हा प्रचारातील महत्वाचा मुद्दा असल्याने त्याचे खापर पालकमंत्र्यावर फोडले जात असले तरी सत्तेत मोठा भाऊ म्हणून असलेल्या शिवसेनेने काय करुन दाखवले असा प्रश्नही मतदार विचारत आहेत. वाडा पालकमंत्री सवरा यांचे होमग्राउंड असल्याने लढत प्रतिष्ठेची असणार आहे.लोकसभा, विधानसभेतील मोदी लाटेमुळे मिळालेल्या यशामुळे अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा भरणा भाजपमध्ये वाढला आहे. ही भाजपासाठी जमेची बाजू असून त्या जोरावर नगरपंचायतीच्या सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठक्ष रणनिती आखली जात आहे. दरम्यान, अडीच वर्षापूर्वीही जिल्हा परिषद निवडणूकीतही भाजप शिवसेना स्वतंत्र लढले होते. त्यावेळी शिवसेनेने सरशी केली होती त्याचे उट्टे भाजपा काढणार का? की पुन्हा सेनेला आघाडी मिळेल अशी चर्चा प्रभागा प्रभागात रंगत आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा