पालघर : पालघरसह वापी, सुरत या भागातून चोरून आणलेल्या लॅपटॉप, मोबाईल असा सुमारे ३ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात पालघर पोलीसांना यश आले असून दोन आरोपींना अटक केली आहे.पालघर- बोईसर रस्त्यावरील उमरोली गावात राहणाऱ्या जितनारायण विश्वकर्मा यांच्या घरातून ३० आॅगस्ट रोजी आयपॅड व दोन मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार पालघर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पालघर पो. स्टे. चे पोलीस वरिष्ट निरीक्षक संजय हजारे, सहा. पो. नि. एसडी जंगम, पो. उ. नि. जेएन पाटील, फौजदार दिगंबर सांगळे, राजेश वाघ, के. एस. धनू, चौधरी, अहिरे, घोलप, पवार इ. नी धिरजकुमार सिंग (२०) रा. शिवाजीनगर बोईसर व निखील गणेश घरत (२१) रा. पास्थळ, तारापूर या दोन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पालघर, नंदुरबार, अंकलेश्वर, सुरत येथून लॅपटॉप, आयपॅड, मोबाईल, सोन्या चांदीचे दागिने, मोटार सायकल असा ३ लाख ८१ हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. (प्रतिनिधी)
चोरीचा ३ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त
By admin | Published: October 07, 2016 4:37 AM