पालघर : लोकसभा निवडणुकीला काही तास उरले असताना शिवसेनेने पालघर लोकसभा मतदारसंघातील मतदारयादीची चिरफाड करून बोगस मतदारांचा पर्दाफाश केला आहे. या यादीत ५६ हजार मतदारांची दोन वेळा नावे आणि इतर हजारो मतदारांची तीन, चार, पाच वेळा नावे आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एका महिलेचे तब्बल ६८ वेळा नाव मतदार यादीत आले आहे. ही गंभीर बाब शिवसेनेने निवडणूक यंत्रणेच्या निदर्शनास पुराव्यासह आणून दिली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शिवसेनेने मतदारयादीची छाननी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या. वसई, नालासोपारा, बोईसर या तीन विधानसभा क्षेत्रात बोगस नोंदणी झल्याचा संशय शिवसेनेने व्यक्त केला आहे. हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्यामुळे हजारो मतदारांची नावे दोन वेळा आण तीन वेळा आली आहेत. सुरेखा सुरेश मोरे या महिलेचे ६८ वेळा आणि सुरेखा सुरेश जाधव या महिलेचे ४६ वेळा मतदारयादीत नाव आले आहे. ही गंभीर बाब सहा विधानसभा मतदारसंघात घडली असून सर्व पुरावे आमदार रविंद्र फाटक, राहुल लोंढे, विकास रेपाळे, प्रभाकर रावल या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालघर जिल्हा निवडणूक अधिकारी यांना सुपूर्द करून कारवाईची मागणी केली आहे.आयोग करतो आहे कर्मचाऱ्यांना साक्षर मतदार साक्षरतेचे अभियान राबविणाºया निवडणूक आयोगाला सतराव्या लोकसभेकरिता नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी काहींना साक्षर करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारण यामधील काही कर्मचाऱ्यांचे राज्यशास्त्र कच्चे असल्याने त्यांना खासदार तथा आमदारातील फरक तसेच ईव्हीएम व व्हीव्हीपॅट याचे कार्यच ठाऊक नसल्याचे समोर आले आहे.
देशातील चौथ्या टप्यातील मतदान सोमवार, २९ एप्रिल रोजी होत आहे. याकरिता नियुक्त केलेले कर्मचारी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिनसह अन्य साहित्य घेऊन त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहचले आहेत. तर सोमवारी सकाळी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत त्यांचा हातभार लागणार आहे. मात्र त्यापैकी काही कर्मचाºयांची खासदार आणि आमदार, संसद तसेच विधिमंडळ यातील फरक सांगताना भांबेरी उडते आहे. विशेष म्हणजे या कर्मचाºयांमध्ये नियुक्त करण्यात आलेले शिक्षक आहेत. पालघर लोकासभा मतदार संघात असलेल्या विधानसभा मतदारसंघाची नावेही त्यांना माहित नसल्याचे वास्तव समोर आले आहे. गतवर्षी पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीवेळी डहाणू विधानसभा निवडणूक कार्यालय असलेल्या सेंट मेरीज हायस्कूल येथे एका शिक्षकांच्या ग्रुपमधून रंगलेल्या चर्चेने तर तोंडात बोटं घालायची वेळ आणली होती.
रविवारी दुपारीच साहित्य, कर्मचारी पोहोचले मतदान केंद्रांवरपालघर : पालघर लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या पोलिंग पार्टीना रविवारी ईव्हीएम बॅलेट सह सर्व साहित्याचे वितरण करण्यात आले. नियोजित कार्यक्र मानुसार दुपारी आपल्या वाहनांसह सर्व मतदान केंद्राध्यक्षानी आपल्या मतदान केंद्राचा ताबाही घेतला. डहाणू मध्ये ३२७ मतदान केंद्रे असून सेंट मेरी स्कूल, मसोली येथे साहित्याचे वाटप करण्यात आले. विक्रमगड ३४८ केंद्राच्या साहित्याचे वाटप भारती विद्यापीठ, जव्हार.पालघर च्या ३२२ केंद्राचे साहित्य वाटप स तु. कदम विद्यालय पालघर, बोईसर ३५३ केंद्राचे वाटप टीमा हॉल, बोईसर, नालासोपारा ४८९ केंद्राचे वाटप वृंदावन गार्डन, विविएमसी मल्टीपर्पज बिल्डिंग, नालासोपारा, तर वसई मध्ये ३८८ केंद्राचे वाटप सेंट जिजी कॉलेज वसई येथे करण्यात आले. प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्षासह दोन अधिकारी, एक शिपाई व एक पोलीस अशी टीम नियुक्त आहे. ईव्हीएम मशीन मध्ये होणारा बिघाड पाहता २० टक्के अधिक मशिन्स पुरविण्यात आलेली आहेत.