डहाणू : या तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीतील २९ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बाडापोखरण प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या वानगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राला चार-पाच दिवसांपासून वीज नसल्याने डहाणूच्या बंदरपट्टी भागातील गावात आठ दिवसांपासून पिण्याची पाणी नसल्याने ग्रामस्थांचे हाल सुरू आहे. तर वीज महावितरण कंपनीचा भोंगळ काराभारामुळे चिंचणी, वरोर, वानगाव हे तीन फिडर ब्रेकडाऊन झाल्याने येथील नागरिकांना चार दिवस अंधारात काढावे लागले आहे. त्यामुळे या परिसरातील लोक कमालीचे संतापले असून विजेवर अवलंबून असलेले डायमेकर्स, लघुउद्योजक, कारखानदार यांना हातावर हात देऊन बसण्याची वेळ आली आहे. परिणामी घरोघरी चालणाºया डायमेकिंग ग्रामोद्योगचे हजारो कुशल-अकुशल कारागिरांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.डहाणूच्या चिंचणी, वरोर, वाणगाव, कनगाव, ओसार, बावडा, केतरवाडी, डहाणू, गुंगवाडा, तडियाबी इत्यादी गावात तसेच खेड्यापाड्यात विजेचा सातत्याने लपंडाव सुरू आहे. सोमवार (१० जून) रोजी या परिसरात पावसाची तुरळक सरी पडल्याचे निमित्तच झाले. रात्रभर लोकांना अंधारात काढावी लागली. दुसºया दिवशी वीजपुरवठा सुरळीत होईल, असे वाटले. परंतु एक-दोन नव्हे सलग गुरुवार (१४ जून) पर्यंत या भागातील गाव पाडे कोळोखात बुडाली. बोईसर येथून वीज पुरवठा करणाºया १३२, १३३ के.व्ही.मध्ये सातत्याने बिघाड सुरू झाल्याने शिवाय, चिंचणी, वानगाव, वरोर फिडर अंतर्गत येणाºया गावातील फ्यूज, डिओ, झंपर, डिश जाणे, तारा तुटणे, ट्रान्सफार्मर फेल होणे, कंडक्टर उडणे, इत्यादी बिघाड वारंवार सुरू झाल्याने घराघरातील इर्न्व्हटर सोडा परंतु मोबाईल चार्ज होणे अवघड झाल्याने येथील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली असून ग्रामस्थांचा सहनशीलतेचा अंत झाला आहे.विजेचा लपंडाव सुरूचचिंचणी, वानगाव, वरोर हे तीन्ही फिडर ब्रेकडाऊन झाल्याने येथील महावितरणे कर्मचारी तसेच उपअभियंत्यांनी रात्रं-दिवस काम केल्याने शुक्रवार (१५ जून) रोजी प्रचंड विजेचा लपंडाव असला तरी वीजपुरवठा सुरू झाला आहे.विशेष म्हणजे या परिसरात तसेच वानगाव येथील साखरे धरणाजवळ वीजपुरवठा खंडित झाल्याने २९ गाव तसेच पाड्यावरील लोकांवर पावसाचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. वानगावात वीज महावितरणच्या हलगर्जीने वीज पुरवठा सुरळीत नाही.
डहाणूमधील २९ गावांत आठ दिवसांपासून पाणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 10:42 PM