शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सोहळ्यास मैदान नाहीच, वसई-विरार महापालिकेचा आडमुठेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 3:06 AM

वसई : शासकीय कार्यक्रम असतानांही संविधान दिन सोहळ्याबाबत वसई विरार महापालिका उदासीन आहे.

शशी करपे वसई : शासकीय कार्यक्रम असतानांही संविधान दिन सोहळ्याबाबत वसई विरार महापालिका उदासीन आहे. गेल्या वर्षीही संविधान दिन सोहळ्यास मैदान नाकारणा-या महापालिकेने यंदाही तोच कित्ता गिरवला आहे. हे मैदान खेळासाठी राखीव असल्याने ते या सोहळ्यासाठी देता येत नाही, असे कारण देण्यात आले आहे.दर २६ नोव्हेंबरला शासनातर्फे संविधान दिन सरकारी कार्यालयांमध्ये साजरा करण्यात येतो. मात्र, या दिनाचे कार्यक्रम घेण्यात वसई विरार महापालिका उदासिन असते. त्यामुळे वसईतील सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन संविधान दिन गौरव समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून गेल्यावर्षापासून नालासोपारा येथे संविधान दिन साजरा करण्यास सुुरुवात केली आहे. पण, पहिल्याच वर्षी महापालिकेने त्यात खोडा घातला होता. सोहळा अवघ्या दोन दिवसांवर आला असतांना महापालिकेने कार्यक्रमासाठी शूर्पारक मैदान नाकारले होते. याविरोधात आयोजकांनी न्यायालयात दाद मागितली होती. तेंव्हा अगदी शेवटच्या क्षणी मैदान देण्यात आले होते.महापालिकेने मैदान दिले नाही तरी नालासोपाºयातील श्रीप्रस्थ मैदानात हा कार्यक्रम केला जाणार आहे.महापालिकेने संविधान दिनानिमित्त प्रत्येक प्रभाग समिती, शाळांमध्ये कार्यक्रम केले पाहिजेत. पण, स्वत: कार्यक्रम करायचा नाही आणि इतरांकडून होणाºया कार्यक्रमात महापालिका अडथळे आणत आहेत. असा आरोप संविधान गौरव समितीचे अध्यक्ष महेश राऊत यांनी केला आहे. ज्या संविधानावर महापालिकेचा कारभार चालतो, तो संविधान दिन महापालिका साजरा करीत नाही ही शोकांतिका आहे. इतर कार्यक्रमांसाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणारी महापालिका या कार्यक्रमासाठी निधी सोडा, साधे मैदानही देत नाही. उलट अडवणूक करीत आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे. महापालिकेच्या कार्यालयात दरवर्षी संविधान दिन साजरा केला जातो, असे उपायुक्त अजीज शेख यांचे म्हणणे आहे.ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनाग्रा, आॅल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस मोहम्मद उमरैन महफुज रेहमानी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, ओबीसी सत्यशोधक समितीचे राज्य संघटक उल्हास राठोड यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. आता या संघर्षानंतर महापालिकेला आपला निर्णय बदलण्याची सद्बुद्धी सुचते आहे काय? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.>महापौरांच्या वाढदिवसाचा बार मात्र जोरातसंविधान दिन कार्यालयापुरताच साजरा करणाºया महापालिकेने यंदा २६ नोव्हेंबरला महापौर प्रविणा ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वसई विरार परिसरात अनेक कार्यक्रमाचा बार उडवून देण्याची जय्यत तयारी सुरु केली आहे.यादिवशी मुख्य कार्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन, पाणी पुरवठा योजनांचे उद्घाटन यासह अनेक नागरी सुविधांची उद्घाटने होणार आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार