शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

अनधिकृत शाळांचे रेकॉर्डच नाही

By admin | Published: July 07, 2015 11:15 PM

पालघर जिल्हापरिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाकडे जिल्ह्यातील आठ तालुक्यामधील अनधिकृत शाळांची माहितीच उपलब्ध नाही.

हितेन नाईक  पालघरपालघर जिल्हापरिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाकडे जिल्ह्यातील आठ तालुक्यामधील अनधिकृत शाळांची माहितीच उपलब्ध नाही. तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांकडूनही या शाळावर कारवाई केली जात नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात लोटले जाणार आहे. या प्रकाराला जबाबदार कोण? असा जळजळीत सवाल विद्यार्थी व पालकांनी उपस्थित केला आहे.पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा, वसई या तालुक्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून त्या त्या भागातील अनधिकृत ठरविलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना नोटीसी बजावण्यात आल्या आहेत. या अनधिकृत शाळावर कारवाई करण्याबाबत स्थानिक व दैनिक वृत्तपत्रात नोटीसाही बजावण्यात आल्याचे पालघर पचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विकास पिंपळे यांनी सांगितले. या नोटीसीद्वारे सूचित करतांना काही शाळा अनेक वर्षापासून अनधिकृतपणे सुरू असल्याने या शाळा तात्काळ बंद करून शंभर रुपयांच्या स्टँम्प पेपरवर तसे हमीपत्र लिहून देण्याचे कळविण्यात आले होते. अन्यथा शिक्षण हक्क कायद्यातील कलम १८(५) नुसार अनधिकृत शाळा व्यवस्थापनाला १ लाखाचा दंड व सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास प्रत्येक दिवशी १० हजार रुपये दंडाची कार्यवाही करण्याचे कळविण्यात आले आहे. तसेच संस्थाचालकाविरोधात भारतीय दंडसहिता कलम ४२०, ४०६, ३४ ब अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्याही नोटीसा प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधीत अनधिकृत शाळांच्या व्यवस्थापनाला बजाविल्या आहेत. परंतु आजही पालघर जिल्ह्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे धाडस शिक्षण विभागाने केलेले नाही असे दिसून येत आहे.पालघर जि. प. च्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पालघर तालुक्यात पाच शाळा अनधिकृत असल्याची नोंद असली तरी पालघर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयातून पालघर तालुक्यात अकरा शाळा अनधिकृत असल्याची नोंद करण्यात आली असून त्यांनी १५ जानेवारी २०१५ ला नोटीसीही बजावल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग व पालघर पंचायत समितीच्या नोंदी मध्ये मोठी तफावत दिसत आहे.