रविंद्र साळवेमोखाडा : मागेल त्याला काम आणि पंधरा दिवसात दाम या तत्वावर आधारलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा कितीही गवगवा होत असला तरी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही योजना बासनात गुंडाल्याचा प्रत्यय आदिवासीना येत आहे.आसे ग्रामपंचायतीतील २१ गावपाड्यांपैकी एक असलेल्या कुंभी पाडा येथील आदिवासीना गेल्या तीन वर्षांपासून रोजगार हमीचे कामच मिळालेले नाही. मोखाड्यापासून ३० किमी अंतरावर असलेल्या या गावाला लोकमतने भेट दिली असता येथील आदिवासीनी आपल्या व्यथा मांडल्या.या आदिवासी पाडयात कामच मिळाले नसल्याने येथील आदिवासी रोजगारा अभावी मुलाबाळांसह स्थलांतरीत झाले आहेत. येथील काही मजूरांनी महीन्याभरापूर्वी रसत्याचे काम केले आहे परंतु त्यांना त्याची मजूरी अद्यपही मिळालेली नाही गेल्या तीन वर्षात पुरेसे काम मिळाले नाही जवळपास जे मिळाले त्याचीही मजुरी मिळाली नसल्याने स्थानिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.गेल्या तीन वर्षांपासून आम्हाला रोजगार हमीचे काम मिळालेले नाही यामुळे आमचे सर्व आदिवासी बांधव मूलबाळांसह स्थलांतरीत झाले आहेत ज्यांना आम्ही मतदान केले आहे त्यांनी सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे.- चंदर सखाराम राऊत, कुंभी पाडा, ग्रामस्थआम्ही या आदिवासी पाड्याला भेट दिली यावेळी येथील आदिवासी बांधवांनी येथील समस्या व रोजगाराचा प्रश्न मांडला. त्यांना गेल्या तीन वर्षांपासून रोजगार मिळालेला नाही. यामुळे तो तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अन्यथा या मागणीसाठी आम्हाला उग्र आंदोलन उभारावे लागेल.- राजू गोविंद साळवे,कार्याध्यक्ष, आरपीआय, मोखाडा
कुंभीपाड्यात तीन वर्षे रोहयोचे कामच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:45 AM