मोखाडा : तालुक्यातील आदिवासी गाव पाड्यांना टँकर मुक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासुन स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनीधी कडून होणाऱ्या तोकड्या प्रयत्नांमुळे येते पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. टंचाईकाळात येथील टॅँकर लॉँबी पोशित होत असून तालुक्यातील ८६ गावपाड्यांना टंचाईचे चटके बसत आहेत.
नियोजनाचा अभाव, अपयशी ठरलेल्या नळ पाणी पुरवठा योजना, जलयुक्त शिवार योजना आदी मुळे टँकर मुक्त गावाची संख्या वर्ष निहाय कमी होण्या ऐवजी दरवर्षी वाढत चालली असुन महिलांना मैलोंमैल पायपीट करावी लागत आहे. तालुक्यात जवळपास पाच धरणे असुन त्याद्वारे १२० किलो मीटर अंतरावरील मुबंई शहराला त्याद्वारे पाणी पुरवठा होत असताना येथील गाव-पाड्यांना पाण्यासाठी दाहीदिशा फिराव्या लागत आहे.
तालुक्यातील धामणी, दापटी, गोळीचापाडा, स्वामीनगर, शास्त्रीनगर, भोवाडी, बिवलपाडा, कुडवा, आसे, वारघरपाडा, पेडक्याचीवाडी केवणाळा गोमघर, डोल्हारा, मोरहंडा, साखरवाडी, वाशिंद, शेलमपाडा, बनाचीवाडी सप्रेवाडी जांभूळवाडी चिकन पाडा बेरीस्ते, शेंड्याचीमेट अशा ८६ गाव पाड्यात पाणी बाणीचे संकट निर्माण झाले आहे. दिवसाआड पाणी टंचाई ग्रस्त गाव पाड्यांना २४ टँकर ने पाणी पुरवठा सुरू असून हिरवे पिंपळपाडा, पाटीलपाडा, कोडेसागवाडी, पारध्याचीमेट, कातकरीवाडी, उंबरवाडी, तेली उंबरपाडा, रामडोह अशा ११ गाव पाड्याची टँकरने पाणी पुरवठा मागणी प्रस्ताव पडून आहे.
दिवसा गणिक टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे मागणी प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाकडे येऊन धडकत असल्याने प्रशासनाची देखील धावपळ उडत आहे. यामुळे उन्हाळाच्या सुरवातीला दरवर्षी उद्भवणाºय परिस्थितीवर कायम स्वरुपी तोडगा काढण्याचे शहाणपण मात्र कोणालाच सुचत नसल्याने गाव पाडावासीयांकडून रोष व्यक्त केला जात आहे. गाव पाड्यांना पाणी पुरवठा करणाºया विहिरी पासुन टंचाई ग्रस्त गाव पाडे २० - २५ किलो मीटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागत आहे.
विक्रमगडची मदार तीन टॅँकरवर संभाव्य आराखडा ८४ गावांचाविक्रमगड : तालुक्यात उष्णतेमुळे पाण्याची पातळी कमी झाली असून तालुक्यातील नदी, नाले, ओहळ, आटून गेले आहे त्यांमुळे लोकाना पिण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ही दहाकता अशीच राहली तर तालुक्यात भिषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. संभाव्य आराखडा हा ८४ गावाचा बनविण्यात आला असून आता पर्यत तालुक्यातील खुडेद पैकी धोडीपाडा, कुडाचापाडा झापपाडा या तीन ठिकाणी टँकर ने पाणी पुरवठा सुरू आहे. कोडगाव पैकी कोडगाव गावठाण, डोगरपाडा, कातकरीपाडा, विळशेत तसेच आंबिवली पैकी गवतेपाडा, ठाकरेपाडा, विजयनगर या गावपाड्यानी टँकरची मागणी केली आहे. प्रस्तावित टॅँकर प्रस्ताव प्रलंबित असल्याने समस्या वाढल्या आहेत.