वसई : तुंगारेश्वर अभयारण्यातील हिरवळीवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या ४८ इमारती आणि ढाबे भुईसपाट करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. नॅशनल पार्कचे कर्मचारी आणि एसआरपीएफ च्या सहायाने लवकरच या कारवाईला सुरवात होणार असल्याचे वनक्षेत्रपाल दिलीप तोंडे यांनी सांगितले.या जागेवर सुमारे ३० इमारती उभारण्यात आल आहेत.तर ६ ढाबे वजा हॉटेलही या जागेवर वसली आहेत. काही नागरिकांनी या इमारती आणि ढाबे जमीनदोस्त करण्याची मागणी वनविभागाकडे केली होती.त्यामुळे कारवाईचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी वसई-विरार महापालिकेचेही सहर्काय घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ५३,५४ आणि ५४ अ अन्वये ही कारवाई करण्यात येणार आहे.त्यासाठी १६ जून २०१५ ला नोटीसाही देण्यात आल्या होत्या.त्यावर सुनावणी होवून सदरची बांधकामे बेकादेशीर असल्याचे सिद्ध झाले. त्यात कोल्ही-३०,चंद्रपाडा-१२,बापाणे-२,मालजीपाडा-२,देवदळ-१ आणि सारजामोरी १ अशा ४८ बांधकामांचा समावेश आहे. येत्या आठवड्यात गोखिवरे वनविभागाचवतीने ती भुईसपाट करणत येणार असून,तसा आराखडाही तयार झाला आहे, अशी माहिती तोंडे यांनी दिली. (प्रतिनिधी)
अवैध ४८ इमारती, ढाबे भुईसपाट होणार
By admin | Published: November 15, 2016 4:17 AM