शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

'वसईत पोलीस आयुक्तालय होणारच, कायद्यात राहात तर फायद्यात राहाल!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 11:31 PM

विजयकांत सागर : पोलीस दलात मनुष्यबळ व साधनसामग्री यातही चांगली वाढ होणार

नालासोपारा : लोकसंख्या वाढीचे प्रमाण आणि आपल्याकडे उपलब्ध असणारे पोलीस बळ याचा ताळमेळ बसविणे अवघड आहे. अशाही परिस्थितीत आपले अधिकारी व कर्मचारी आपला कारभार नीट सांभाळत आहेत. मात्र आता आपल्याकडे लवकरच पोलीस आयुक्तालय येत असल्याने आपले मनुष्यबळ व साधनसामग्री यात चांगली वाढ होणार आहे. त्यामुळे कायद्यात राहाल, तर फायद्यात राहाल. नागरिकांनी त्याबाबत निश्चिंत राहावे, असे आवाहन वसई विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी वसई-नालासोपारा येथे केले.पालघर पोलीस विभागाच्या ‘रेझिंग डे सप्ताहा’चे गुरुवारी संध्याकाळी नालासोपारा पोलीस ठाण्यात उद्घाटन झाले. या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या समवेत विभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील (वसई), रेणुका बागडे (विरार), अमोल मांडवे (नालासोपारा) आणि त्या त्या विभागातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. शहीद जवान संदीप सावंत व अर्जुन थापा यांना श्रद्धांजली व म. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करून या कार्यक्र माची सुरुवात झाली. आपल्या भाषणात अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर पुढे म्हणाले की, हा सप्ताह विविध सत्रात विभागून होणार असून या निमित्ताने विद्यार्थी, युवक, युवती, महिला आणि ज्येष्ठ नागरिक या समाजगटांना समाविष्ट करण्यात आले आहे. या सर्वांना पोलिसांचे दैनंदिन कामकाज, शस्त्रे, नवे कायदे, स्वसंरक्षण, खबरदारी आणि न्याय्य हक्क यासंदर्भात योग्य ती माहिती दिली जाईल. सोबत जागृतीही केली जाईल. बेकायदेशीरपणे विदेशी नागरिक इकडे येतात, स्थिरावतात, वाहने घेतात आणि वर कायदा मानत नाहीत. अशांवर अधिक कठोर कारवाई केली जाणार आहे. आपणच अशांना अधिक मोबदला मिळतोय म्हणून घरे भाड्याने देत आहोत, छोटी-मोठी वाहने देत आहोत हे योग्य आहे का? आता परदेशी नागरिकांची माहिती लपविणाऱ्या वा आश्रय देणाºया लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. या समस्या आपण सारे मिळून दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या वेळी इतर उपस्थित पोलीस उपअधीक्षकांची देखील समयोचित भाषणे झाली.या सोहळ्यात नालासोपारा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिक, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, तटरक्षक दलाचे सदस्य, पोलीस पाटील, मोहल्ला कमिटी मेंबर्स, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या सोहळ्याचे नेटके सूत्रसंचलन वाहतूक पोलीस कर्मचारी राजेश गायकवाड यांनी केले. तर नालासोपारा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी आभार प्रदर्शन केले.नागरिक व पोलिसांचा सन्मान करणार!या सप्ताहात या भागात ज्यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावली आणि पोलिसांना भरीव सहकार्य दिले अशांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याचेही विजयकांत सागर यांनी सांगितले.